शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे तुडतुड्याचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धान काढणीला आला असताना अतिवृष्टी झाली. यातून सावरत नाही तोच आता रसशोषक तुडतुड्याचे धानावर आक्रमण झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी पावसाची प्रतीक्षा तर कधी अतिवृष्टीचा फटका. अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता हातातोंडाशी धान आला असताना तुडतुड्याचे संकट उभे ठाकले आहे. लाखनी, पवनी, लाखांदुर तालुक्यात तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धानाचे पीक तणस होत आहे. कीड नियंत्रण करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धान काढणीला आला असताना अतिवृष्टी झाली. यातून सावरत नाही तोच आता रसशोषक तुडतुड्याचे धानावर आक्रमण झाले आहे. बुंध्यातून रस शोषून घेत असल्याने धान पूर्णत: उद्ध्वस्त होत आहे. तुडतुड्याचे आक्रमण झाले की धान निसवत नाही आणि धान निसवला तर दाणा भरत नाही. त्यामुळे धानाचे अक्षरश: तणस होते. लाखांदूर, लाखनी, पवनी तालुक्यात ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला असून धानपीक पिवळे झाले आहे.तुडतुडा तीन प्रकारचा असतो. त्यात हिरवा तुडतुडा, पांढरा तुडतुडा आणि राखाडी तुडतुडा यांचा समावेश आहे. पांढरा आणि राखाडी रंगाचा तुडतुडा हानीकारक आहे आणि याच तुडतुड्याचा प्रादुर्भाव धानावर झाला आहे. आठवड्यातून दोन फवारण्या करुनही कीड नियंत्रणात येत नाही. एकरी एक हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे संपूर्ण धानपीक उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.तुमसर तालुक्यातही तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे. पवनारा, बघेडा, चिंचोली, भोंडकी, मोखे आदी गावात काही शेतांमध्ये प्रकोप दिसून येत आहे. हा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

असे करा नियंत्रण- धानावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी नत्र खतांची वाजवीपेक्षा जास्त मात्र देऊ नये. या किडींचे सतत निरीक्षण करुन नुकसानीची पातळी गाठताच बुप्रोफेजिन २५ एससी १६ मिली किंवा इमीडाक्लोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली किंवा ट्रायझोफाॅस ४० टक्के प्रवाही २० मिली किंवा थायमिथाक्झाम २५ डब्लुजी २ ग्रॅम, फिप्रोनिल ५ एससी २० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भातावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी भाताच्या बुंध्याकडील भागावर तुडतुडे शोषण करतात. तेथे फवारणी करावी.

 

टॅग्स :agricultureशेती