शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू, १३८ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 5:00 AM

शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ११४, मोहाडी २६०, लाखनी १८२, तुमसर १९२? पवनी ११४, लाखांदूर ६० रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकूण संख्या १८८४ । मृतांची संख्या पोहचली ३३ वर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस कोरोना संसर्गात वाढ होत असून शनिवारी जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून १३८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १८८४ वर पोहचली असून ३३ जण आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावले आहेत.ऑगस्ट महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. गत तीन दिवसांपासून तर १०० च्या वर रुग्ण येत आहेत. शनिवारी १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात भंडारा ८८, मोहाडी १८, लाखनी १६, पवनी ७, तुमसर ६ आणि लाखांदूर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ९२६ रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. साकोली तालुक्यात आतापर्यंत ११४, मोहाडी २६०, लाखनी १८२, तुमसर १९२? पवनी ११४, लाखांदूर ६० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १८८४ रुग्णांपैकी ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ९१४ व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत आहेत.भंडारा तालुक्यातील एक आणि तुमसर तालुक्यातील दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. तिघेही भंडाराच्या आयसोलेशन कोविड आयसीयु वॉर्डात उपचार घेत होते. आता मृतांची संख्या ३३ वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. गत तीन दिवसांपासून दररोज शंभरच्यावर रुग्ण येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीट द्वारे कोरोना रुग्णांची अलिकडे तपासणी केली जात आहे. १२ हजार ६४९ व्यक्तींचे नमूने आतापर्यंत अ‍ॅन्टीजेन कीटद्वारे तपासण्यात आले. त्यात १२०३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अ‍ॅन्टीजेन कीट टेस्टमुळे रुग्णांची संख्या वाढत असून नागरिक आता स्वयंप्रेरणेने ही टेस्ट करून घेत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या