शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मृतांच्या वारसांना मदतीचा ‘तो’ मेसेज बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गात अनेकांचा बळी गेला. अशा बळी गेलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत एक अर्जही देण्यात आला आहे. हा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर मदत मिळेल, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसत आहे. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत.

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेवू नका : चार लाखांच्या मदतीचा आदेश त्याच दिवशी घेतला होता मागे

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत केंद्र सरकार देत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियातून सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मेसेजबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, व्हायरल मेसेज बनावट असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे ४ लाखांच्या मदतीचा केंद्राने काढलेला आदेश त्याच दिवशी मागे घेण्यात आला. मात्र, तोच आदेश सध्या व्हायरल होत आहे.कोरोना संसर्गात अनेकांचा बळी गेला. अशा बळी गेलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचा एक संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजसोबत एक अर्जही देण्यात आला आहे. हा अर्ज जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर मदत मिळेल, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसत आहे. अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत. लाखांदूर, साकोली आणि ग्रामीण भागातून अनेक जण पदरमोड करून जिल्हा कचेरीत पोहोचत आहेत. परंतु, तेथे त्यांना अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले जाते. याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृह विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात मृताच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु, त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेतले. मात्र, आजही पहिलेच परिपत्रक सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. कोरोना बळींच्या वारसांसाठी सध्यातरी अशी कोणतीच योजना नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

अनेकांना होतोय मनस्ताप- आधीच कोरोनाने घरातील व्यक्ती हिरावून नेला. त्या दु:खात असताना असे बनावट संदेश व्हायरल होत आहेत. मदतीच्या आशेने अनेक जण जिल्हा मुख्यालय गाठून याबाबत चौकशी करतात. परंतु, तेथे अशी योजना नसल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच आर्थिक फटकाही बसतो. अशा अफवांवर विश्वास न ठेवलेलाच बरा. सोशल मीडियाच्या माध्यमातुन अनेकदा बनावट मॅसेज व्हायरल होतात. कोणतीही खात्री न करता ते फाॅरवर्ड केले जातात. जवळच्या व्यक्तीने पाठविलेला संदेश खराच असेल असे समजून त्यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे एखादा संदेश पाठविण्यापूर्वी त्याची खात्री करणे तेवढेच महत्वाचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgovernment schemeसरकारी योजना