अत्यल्प मानधनावर राबतात स्वयंपाकी महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:34+5:30

राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते.

Cooking women carry out minimal honors | अत्यल्प मानधनावर राबतात स्वयंपाकी महिला

अत्यल्प मानधनावर राबतात स्वयंपाकी महिला

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : केवळ दीड हजार रुपये मिळते मानधन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शालेय पोषण आहार योजनेसाठी राबराब राबणाऱ्या स्वंयपाकी महिलांना अत्याल्प मानधनावर काम करावे लागत असून महागाईच्या काळात त्यांना केवळ दीड हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहर शिजविणाºया महिलांमध्ये असंतोष पसरला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते. भंडारा जिल्ह्यात दोन हजारांच्या वर स्वयंपाकी शाळातून कार्यरत आहेत. स्वयंपाकींना दरमहा हजार रुपये मानधन दिले जात होते. एप्रिल २०१९ पासून शिक्षण विभागाने निर्णय घेऊन त्यांचे मानधन दीड हजार रुपये केले.
स्वयंपाकी महिलांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. शाळासुरु झाल्यापासून म्हणजे सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामे करावी लागतात. शासनाने किमान वेतन कायदा तयार केला. परंतु आहार शिजविणाºया स्वयंपाकींना अल्प मानधनावर राबवून शासन त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे दिसून येते. आहार शिजविणाºया महिला स्वयंपाकी या एक कर्मचारी आहेत. शाळेत आल्यापासून त्या अन्न शिजविण्याचे काम, तांदुळ व धान्याची साफसफाई करणे, विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप, जेवणाच्या जागेवर करणे, आहार वाटपानंतर जागेची साफसफाई करणे, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे, भांड्याची साफसफाई करणे, ताटांची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, विद्यार्थ्यांना पाणी देणे, अन्न शिजविणाºया यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवण्याचे कामे स्वयंपाकींना करावे लागते. सदर कामे दिवसभर चालतात.
स्वयंपाकींना दरमहा पाच हजार रुपये मानधनाऐवजी किमान वेतन, सामाजिक सुरक्षतेच्या योजना स्वयंपाकीसाठी राबविणे, त्यांना गणवेश व परिचय पत्र देण्याच्या मागण्या स्वयंपाकीच्या आयटक प्रणित पोषण आहार कर्मचारी युनियनद्वारे करण्यात आलेले आहेत.

महिला मागणार शासनाकडे दाद
आहार शिजविणाºया कर्मचाऱ्यांना वर्षभरातून दहा महिन्याचे मानधन दिले जाते. त्यांच्या निवडीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. शालेय प्रशासनाकडून शाळेची कामे स्वयंपाकी महिलाकडून केली जातात. काही ठिकाणी अभद्र वागणुकही दिली जाते. अन्य मानधनावर काम केल्यामुळे त्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सदर महिलांना न्याय मिळावा याकरिता शासनाकडे महिला स्वयंपाकी दाद मागत आहे.

Web Title: Cooking women carry out minimal honors