शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील धान खरेदी केंद्र बंद

By admin | Updated: June 9, 2015 00:49 IST

कृषी बाजार समित्यांमध्ये धानाचे भाव पडलेले आहेत. ८०० ते ९०० रुपयात धानाची खरेदी-विक्री होत आहे.

शेतकऱ्यांसमोर धान विकण्याचा प्रश्नबळीराजा सापडला आर्थिक कोंडीतकरडी (पालोरा) : कृषी बाजार समित्यांमध्ये धानाचे भाव पडलेले आहेत. ८०० ते ९०० रुपयात धानाची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र त्यासाठी पर्याय ठरु शकत होते. योग्य भाव मिळू शकत होते. मात्र तालुक्यात कुठेही धान खरेदी केंद्र सुरु नाहीत. पालोरा येथील एकमेव केंद्र सुध्दा बंद आहे. त्यामुळे उन्हाळी धान विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मोहाडी तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था मोहाडी यांचे माध्यमातून धानाची शासकीय आधारभूत किमतीत खरेदी केली जात होती. हलक्या प्रतिच्या धानाला चांगला भाव मिळत होता. मात्र आज शासकीय खरेदीच बंद असल्याचे दिसून येते. खरेदी सुरु व्हावी, पर्यायी व्यवस्था तरी शेतकऱ्यांना देता यावी, या दृष्टीने लोकप्रतिनिधींचे प्रयत्न दिसून येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.करडी परिसरातील अनेक गावात व आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी ९०-१०० दिवसाचे धानाची लागवड केली. मागील महिन्यापासून धानाची कापणी व मळणी सुरु आहे. परिसरात पालोरा याठिकाणी एकमेव शासकीय धान खरेदी केंद्र असून सध्या त्या केंद्राची धान खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना हाती आलेले धानाचे पीक खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत.मागील खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने तसेच रिसाळा मायनरचे पाणी करडी परिसरात न मिळाल्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. हाती आलेले जोमदार पीक वाळून तण झाले होते. सध्या पावसाळ््याला सुरुवात झाली आहे. मागील दोन-तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत धानाचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. कृषी बाजार समित्यांमधून ८०० ते ९०० रुपयांत धानाची खरेदी-विक्री होत आहे. धानाचा उत्पादन खर्च, खताचे, बियाण्याचे व विजेचे दर लक्षात घेता मिळणारा भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे.आज-उद्या केंद्र सुरु होतील या आशेने शेतकरी खरेदी केंद्राच्या चकरा मारत आहेत. वारंवार विचारणा करीत आहेत. परंतु केंद्र केव्हा सुरु होईल. किंवा नाही याचे उत्तर अजूनही कुणाकडून सांगितले जात नाही. शेतकऱ्यांत लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधात रोष व्यक्त होत आहे. तालुक्यातील धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर उन्हाळी धान विकायचे कुठे असा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर)जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेची परवानगी काढून घेतली आहे. क्षेत्राच्या आमदारांच्या तक्रारीमुळे तालुक्यातील चार केंद्राची धान खरेदी बंद आहेत. परवानगी नसल्याने व तसे पत्र संस्थेला मिळाल्याने आमच्याकडे पर्याय नाही. शेतकऱ्याप्रती जिव्हाळा मात्र कायमचा राहील.- सुरेश बिसने, अध्यक्ष तालुका खरेदी-विक्री सह. संस्था मोहाडी.