निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:44+5:30

कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे.

Citizens suffer due to dirt on the road under construction | निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भंडारा ते पवनी राज्यमार्गाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : कारधा ते निलज महामार्गाचे बांधकाम गत काही महिन्यापासून सुरू आहे. या निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीचा फटका नागरिकांना बसत असून अपघातातही वाढ झाली आहे.
महामार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असून एकेरी वाहतुकीचा फटका अनेक वाहनांना बसत आहे. त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्यावरील धुळीमुळे हजारो नागरिकांना प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य नियंत्रण समिती कार्यकर्त्यांनी वैनगंगा पूल ते बेटाळा गावापर्यंत तात्पुरती रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन पवनी तहसीलदारांना देण्यात आले.
कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ता तयार करण्यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाही. एका बाजुला रस्ता तयार होत असताना दुसऱ्या बाजूला मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून यावरुन शेकडो वाहने धावतात. मात्र वाहन चालकांना कायम अपघाताची भीत असते. डोळ्यात धूळ उडत असल्याने समोरचे दिसतही नाही. दूचाकी चालकांना तर या रस्त्यावरुन जाणे म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्त्याच्या जलद गतीने कामासाठी मनोहर मेश्राम, शंकर तेलमासरे, अवनती राऊत, अरविंद धारगावे, सय्यद ताजुद्दीन, प्रकाश भोंगे, महादेव शिवरकर, रमेश मोटघरे, राजू गणवीर, अनिल मेश्राम, आनंदविलास रामटेके, जगन्नाथ मुंडले, प्यारू तलमले, नत्थु हटवार, संतोष लांजेवार यांनी पवनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

अपघात वाढले
निर्मानाधीन रस्त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. गत आठवड्यात ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाचा अपघात होऊन दोन जण ठार झाले होते. दुचाकी अपघातातही वाढ झाली आहे. वाहन चालकांना येथे मोठी कसरत करावी लागते.

Web Title: Citizens suffer due to dirt on the road under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.