बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:11+5:30

सध्या केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपये अनुदान, बिडी पेंशन, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान वाटप सुरू आहे. तसेच ग्राहक बचत खात्यातील पैसेही काढण्यासाठी दररोज बँकेत येत असतात. यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की, पैसे काढण्यासाठी सर्वात जास्त साठ वर्षाच्या वरील लोकांची गर्दी दिसून येत आहे.

Citizens crowded to withdraw money from the bank | बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : वयोवृद्धांना सोसावा लागणार त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोनाचा प्रकोप थांबविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सोमवारी बँके आॅफ इंडिया समोर नागरिकांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सध्या केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपये अनुदान, बिडी पेंशन, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान वाटप सुरू आहे. तसेच ग्राहक बचत खात्यातील पैसेही काढण्यासाठी दररोज बँकेत येत असतात.
यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की, पैसे काढण्यासाठी सर्वात जास्त साठ वर्षाच्या वरील लोकांची गर्दी दिसून येत आहे.
या वयात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने रोगाचा सर्वाधिक धोका या वयोगटातील लोकांना असतो.
मात्र कोणतीही सावधगिरी या लोकांकडून पाळली जात नसल्याने या गदीर्ला रोखण्याचे मोठे आव्हान बँक प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

Web Title: Citizens crowded to withdraw money from the bank

टॅग्स :bankबँक