शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गावातील विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरने शालेय प्रवास

By admin | Updated: September 1, 2016 00:42 IST

बघेडा ते चिचोली मार्गावरची व्यथा : गर्रा बघेडा गावातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, एस.टी. महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

बघेडा ते चिचोली मार्गावरची व्यथा : गर्रा बघेडा गावातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, एस.टी. महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हमोहन भोयर  तुमसरगाव तिथे एस.टी. असा दावा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने या ब्रीद वाक्याला हरताळ फासला आहे. परिणामी बघेडा ते चिचोली फाट्यापर्यंत शाळकरी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरने प्रवास करावा लागत आहे. गर्रा - बघेडा हे गाव सांसद आदर्श ग्राम आहे, हे विशेष.तुमसरपासून १५ कि.मी. अंतरावर सांसद आदर्श ग्राम गर्रा बघेडा आहे. येथील विद्यार्थी - विद्यार्थिनी शिक्षणाकरिता तुमसर येथे दररोज येतात. शाळेच्या वेळेवर येथे बस उपलब्ध राहत नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास योजनेच्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. बघेडा येथील शालेय विद्यार्थी चिचोली फाट्यापर्यंत ट्रॅक्टरने प्रवास करतात. धोका पत्करून विद्यार्थ्यांना जावे लागते. शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेस सोडण्याच्या सूचना राज्य शासनाने त्या-त्या आगाराला दिल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी होत नाही.गर्रा बघेडा हे गाव सांसद आदर्श ग्राम आहे. या गावाला विशेष सेवा पुरविण्याचे निर्देश आहेत. खासदार नाना पटोले यांच्या दत्तक गावाची ही समस्या असेल तर अन्य गावांचा विचार न केलेला बरा.मानव विकास योजनेच्या बसगाड्या वेळेवर भंडारा रोड, माडगी येथील सीबीएसई शाळेकरिता सोडण्यात येतात. दुसरीकडे मानव विकास बसऐवजी लाल रंगाच्या बसमधून प्रवाशांसोबत विद्यार्थिनींना प्रवास करावा लागतो हे विशेष.तुमसर आगारात कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्पतुमसर आगारात चालक व वाहकांची १४१ - १४१ अशी मंजूर पदे आहेत. त्यापैकी सध्या १२२ चालक तर ११७ वाहक आहेत. १९ चालक व २४ वाहकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बसेसचे वेळापत्रक तयार करताना आगारप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी पदे भरण्याची गरज आहे.