शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:35 IST

दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला.

आई व मामा जखमी : भोजापूर येथील घटना, चालक फरारभंडारा : दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. तर त्याची आई व मामा जखमी झाले. ही घटना भोजापूर येथे सोमवारला सायंकाळी घडली. अंशुल महेश नखाते असे मृतक बालकाचे नाव आहे. अंशुल हा त्याची आई कवितासह आजोळी गेला होता. सोमवारला आई कविता, मामा क्रिष्णा भोयरसह तो दुचाकी एमएच ४० एव्ही ११५३ ने सेलोटपार येथून भोजापूर येथे परत येत होते. दरम्यान नागपूर नाका मार्गावरून त्यांनी कच्चा रोड भोजापूरकडे दुचाकी वळविली. यावेळी विरूद्ध दिशेने आलेल्या ट्रॅक्टर एमएच ३६ डी ९४७४ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात अंशुल हा ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच अंत झाला. तर त्याची आई व मामा जखमी झाले. घटना कळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान चालकाने घटनास्थळावर ट्रॅक्टर सोडून पळ काढला.नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अंशुलच्या आईची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. भंडारा पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. ट्रॅक्टरचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)