शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीतील जागृत माता चौंडेश्वरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जाणकारांच्या मते, आज जिथे चौण्डेश्वरी मातेचे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी झुडपी जंगल होते. बाजूलाच गायमुख नदी वाहत असे. हे स्थळ शांत व निसर्गरम्य असल्याने याठिकाणी श्रीसंत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. ते या ठिकाणी तपश्चर्या करायचे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त यात्रा : १,६२२ ज्योतिकलशांची स्थापना

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मोहाडीची कुलदैवत माता चौण्डेश्वरीचे देवस्थान हे एक जागृत देवस्थान आहे. माता चौंडेश्वरीची मूर्ती ही स्वनिर्मित असल्याने या मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मंदिरात यावर्षी १,६२२ ज्योतीकलशांची स्थापना करण्यात आली आहे.मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जाणकारांच्या मते, आज जिथे चौण्डेश्वरी मातेचे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी झुडपी जंगल होते. बाजूलाच गायमुख नदी वाहत असे. हे स्थळ शांत व निसर्गरम्य असल्याने याठिकाणी श्रीसंत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. ते या ठिकाणी तपश्चर्या करायचे. त्यावेळी नारायण स्वामी यांनी रोगराई नष्ट होण्यासाठी गावात शांतता व समृद्धीसाठी महायज्ञ करण्याचे ठरविले. श्री दत्तपाठ गुरुघटाची स्थापना करून त्यांनी महायज्ञ सुरु केले. गावकऱ्यांच्या मदतीने महायज्ञासाठी लागणारी हवनसामुग्री गोळा करण्यात आली. महायज्ञाच्या आवतनासाठी ठेवण्यात आलेली संपूर्ण हवनसामुग्री संपली तरी हवन पूर्ण झाले नाही म्हणून बाजूला ठेवलेले ऋगवेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेदाचे एक एक पान हवन कुंडात सोडण्यात येत असतानाच हवनकुंडातून गर्जना करीत मातेचा मोठा चेहरा बाहेर आला. महायज्ञ पूर्ण झाले असून तुम्ही जे चार वेद हवनकुंडात सोडले त्याचीच शक्ती बनून मी प्रगट झाली आहे. म्हणून तुम्ही मला चौरेदश्वरी म्हणू शकता. गावात सुख, शांती व समृद्धी राहील. सच्चा मनाने जो कोणी माझी आराधना करेल मी त्याची मनोकामना पूर्ण करेल.मातेचा विशाल मुख पाहून नारायण स्वामी यांनी मातेला संपूर्ण शरीरासह बाहेर न येण्याची विनंती केली. मातेने स्मितहास्य करीत विनंती मान्य केली व अंतर्मुख झाली. कालांतराने माता चौरेदश्वरीचे नाव चौण्डेश्वरी असे झाले. मातेचा मुख फक्त हवनकुंडाच्या बाहेर आहे. बाकी संपूर्ण शरीर हवनकुंडाच्या आत जमीनीत असल्याचे सांगण्यात येते.नऊ दिवसांची यात्राचौण्डेश्वरी देवस्थानासमोर नवरात्रोत्सवात नऊ दिवसांची दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. नवरात्री उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उत्तम व्यवस्था करण्यात येते.

टॅग्स :Navratriनवरात्री