शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नातील रेल्वे स्टेशन निर्माण करणार

By admin | Updated: June 5, 2015 00:53 IST

भंडारा रोड रेल्वे स्थान जिल्ह्याचे प्रवेश द्वार आहे. या स्थानकावर समस्या दिसणर नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : भंडारा रोड रेल्वे आर.पी.एफ. चौकीचे उद्घाटन वरठी : भंडारा रोड रेल्वे स्थान जिल्ह्याचे प्रवेश द्वार आहे. या स्थानकावर समस्या दिसणर नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशाच्या सुरक्षेच्या तक्रारी होत्या. त्यासंदर्भात भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आर.पी.एफ. जवानाची स्थायी चौकी सुरू करण्यात आली. लवकरच जी.आर.पी. जवानाची चौकशीसह या रेल्वे स्टेशनवर असलेल्या सर्व समस्या मार्गी लावून स्वप्नातले भंडारा रोड रेल्वे स्टेशन निर्माण होईल, असे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले.भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर आर.पी.एफ. पोलीस चौकीचे लोकार्पण व विविध विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल्वेचे नागपूर विभागाचे डी.आर.एम. आलोक कन्सल, नागपुर मंडळ सुरक्षा आयुक्त डी.बी. गौर, वरिष्ठ मंडळ अभियंता अखिलेश शाहु, विद्युत मंडळ अभियंता आर.के. पटेल, आऊट पोस्ट इनचार्ज वी.बी. भालेकर उपस्थित होते.भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ११ आर.पी.एफ. जवानाची चौकी मंजूर करण्यात आली आहे. सध्या या चौकीचा प्रभार ए.आय.वी.बी. भालेकर असून त्यांच्यासह चार कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आर.पी.एफ. प्रभारी माणिकचन्द्र यांनी दिली. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशाची लुटमार व धावत्या गाडीत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळ्यावर लक्ष ठेवून सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात असलेली भिती दूर होणार असल्याने प्रवाशात आनंद दिसत होता. उद्घाटन कार्यक्रमनंतर खा. नाना पटोले यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व गावकऱ्याची बैठक घेतली. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सेवक कारेमोरे, मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, घनश्याम बोंदरे यांनी विविध समस्या मांडल्या. त्या त्वरीत सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. संचालन व आभार स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी मानले. (वार्ताहर)