बीटीबी देणार १०० महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:05+5:30

सब्जीमंडी भंडारातर्फे विविध नवनविन उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा संकटात देखील अनेकांना माणुसकीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बीटीबीतर्फे पंतप्रधान सहायता निधीला तीन लाख २१ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये देण्यात आले होते.

BTB will provide employment to 100 women | बीटीबी देणार १०० महिलांना रोजगार

बीटीबी देणार १०० महिलांना रोजगार

ठळक मुद्देकोरोना संकटात दिलासा : सहायता निधीसाठीही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र अशा कठिण परिस्थितीत कृषी विभागासाठी नियमात शिथिलता सरकारने दिली आहे. याअंतर्गत भंडारा बीटीबी सब्जीमंडीत विविध कामांतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सब्जीमंडी भंडारातर्फे विविध नवनविन उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा संकटात देखील अनेकांना माणुसकीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बीटीबीतर्फे पंतप्रधान सहायता निधीला तीन लाख २१ हजार रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये देण्यात आले होते.
कोरोनामुळे महिलांचा हाताला काम नसल्याने बीटीबीतर्फे १०० महिला मजुर कामगारांना काम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कामाची विभागणी करण्यात येणार आहे. उपाययोजना राबविण्यासाठी स्वच्छता तसेच मालाची प्रतवारी करणे, निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

कोरोना संकटामध्ये अनेक कुटुंबाचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी जपणाच्या प्रयत्न आहे. गरजूंनी बीटीबीशी संपर्क साधावा.
- बंडू बारापात्रे,
अध्यक्ष, बीटीबी सब्जी भंडारा

Web Title: BTB will provide employment to 100 women