बीटीबीतर्फे नागरिकांना मोफत भाजीपाला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:27+5:30

संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला.

BTB distributes free vegetables to citizens | बीटीबीतर्फे नागरिकांना मोफत भाजीपाला वितरण

बीटीबीतर्फे नागरिकांना मोफत भाजीपाला वितरण

Next
ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : संचारबंदीच्या काळात सामाजिक जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूच्या विरोधात प्रशासकीय पातळीवर लढाई सुरु असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा काळात सर्वसामान्यांना अडचणीचे जाऊ नये म्हणून येथील बीटीबी सब्जीमंडीच्या वतीने शहरात मोफत भाजीपाला वितरण करण्यात येत आहे. सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविला जात आहे.
संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला.
तत्पूर्वी बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी प्रशासनाला भाजीपाला उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. परंतु प्रशासन इतर कामात व्यस्त असल्याने बीटीबीनेच स्वत: पुढाकार घेत भंडारा शहरातील गल्लोगल्ली भाजीचे वितरण सुरु केले आहे.
संचारबंदीमुळे व्यापारी येत नसल्याने मंडीतील भाजीपाल्याला उठाव नाही. भाजीपाला लवकर नष्ट होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सामाजिक भान ठेवून हा भाजीपाला मोफत वितरीत केला जात आहे. भंडारा शहरात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकजण मदतीचा हात देत आहेत. महानगरातून गावाकडे स्थलांतरीत करणाऱ्या मजुरांसाठी भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी असलेल्या बेघरांनाही शासनाच्या मदतीने वसतिगृहात दाखल करण्यात आले आहे.

समाजसेवेच्या भावनेतून मोफत भाजीपाला वाटपाचे नियोजन केले आहे. बीटीबी सब्जीमंडी असोसिएशनच्या वतीने शक्य तेवढा भाजीपाला गरजूपर्यंत पोहचविला जाईल. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्यातीलच हा एक उपक्रम होय.
-बंडू बारापात्रे,
अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी

Web Title: BTB distributes free vegetables to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.