शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

सुरजचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीत पडून होता. शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार लोकेश कानसे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.

ठळक मुद्देशुक्रवारीतील थरार : मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राचे वार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धारदार शस्त्राने मानेवर आणि पोटावर वार करुन एका तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून करण्याची घटना येथील गजबजलेल्या शुक्रवारी परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. खून कोणत्या कारणाने झाला हे तुर्तास कळू शकले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अवघ्या १५ दिवसात शहरात खून होण्याची ही दुसरी घटना होय.
सुरज परमाल यादव (२५) रा. किसान चौक भंडारा असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सुरज आपल्या मोटारसायकलने जात असताना दोन ते तीनच्या संख्येने असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. मानेवर आणि पोटावर सपासप वार केल्याने काही क्षणातच तो खाली कोसळला आणि जागीच ठार झाला. भरदिवसा झालेल्या या खुनाने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती होताच बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सुरजचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीत पडून होता. शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार लोकेश कानसे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.
घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नेवसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
भरदिवसा खून करुन आरोपी पसार झाले. वृत्तलिहीस्तोवर त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. स्थानिक शहर ठाण्याचे डीबी पथक आरोपींचा शोध घेत होते. आरोपींच्या अटकेनंतरच खूनाचे कारण पुढे येणार आहे. सुरज हा मुळचा नागपूर लगतच्या हिंगणा येथील रहिवासी असून तो आपल्या पत्नी व मुलासह किसान चौकात भाड्याचे घर घेवून राहत होता. रोज मजुरी करुन तो चरितार्थ चालवित होता. सुरजची पत्नी नागपूर येथे काही कामानिमित्त गेली होती. सायंकाळपर्यंत ती भंडारात पोहोचली नव्हती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

भंडारात गुन्हेगारीने डोके वर काढले
शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे अलिकडील काही घटनांवरुन दिसून येत आहे. मोटारसायकलचा कट मारण्याच्या कारणावरुन १९ जून रोजी सरफराज कासम शेख (१८) या तरुणाचा भंडारातील डॉ. हेडगेवार चौकात खून करण्यात आला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच सोमवारी भर दिवसा सुरज यादवचा खून करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पोलिसांची करडी नजर असतानाही पंधरा दिवसात दोन खून झाल्याने भंडारा पोलिसांचा वचक संपला की काय? अशी शंका येत आहे.

टॅग्स :Murderखून