शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावच्या ज्योती गडेरियाला पॅरारोव्हिंगमध्ये कांस्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित केले. मंगळवारी सायंकाळी तिचे भंडारा येथे आगमन झाले.

ठळक मुद्देभंडारात स्वागत : अपघातात पाय गमावलेल्या तरुणीची भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातात पाय गमावल्यानंतरही जिद्दीने संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील एका तरुणीने पॅरारोव्हिंगमध्ये कांस्यपदक पटकावून भंडारा जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची मान उंचावली. दक्षिण कोरियात झालेल्या रोव्हिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकाविले. ही तरुणी आहे मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्योती गडरिया.दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित केले. मंगळवारी सायंकाळी तिचे भंडारा येथे आगमन झाले. त्यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. कोरिया येथून कांस्यपदक जिंकून ज्योतीचे मंगळवारी रात्री ९.३० वाजता भंडारा बसस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी रोव्हिंग असोसिएशन, लॉयन्स क्लब ग्रीन सिटी, भ्रूशुंड ढोल पथकाच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष जॉकी रावलानी, उपाध्यक्ष मंगेश वंजारी, कोषाध्यक्ष राजेश चोपकर, भरत मल्होत्रा, आशिष खराबे, सुरेश धुर्वे, गजानन कारेमोरे यांच्यासह तिच्या डोंगरगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा येथे स्वागतानंतर ती आपल्या मूळ गावी डोंगरगाव येथे पोहचली. तेथेही तिचे गावकऱ्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. गावकºयांना आपल्या लेकीचे कौतुक आहे.ग्रामीण तरुणीचे नेत्रदीपक यशमोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्योती गडेरिया ही सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी. वडिलांचा बिछायत केंद्राचा व्यवसाय. काही वर्षापूर्वी रस्त्यावर उभी असताना ट्रकने तिला धडक दिली. त्यात तिचा एक पाय कापावा लागला. विपरित परिस्थितीतही तिची जिद्द मात्र कायम होती. अशातच तिने पुणे येथील आर्मी रोव्हिंग नोड येथून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षक विकल अरुण सार्वे यांच्या मार्गदर्शनात तिने रोव्हिंगचे धडे घेतले. तिला कर्नल दत्ता यांचे मार्गदर्शन लाभले. चिकाटी आणि जिद्दीच्या भरोशावर दिव्यंगात्वावर मात करीत ज्योतीने सातासमुद्रापार आपल्या देशाचा झेंडा रोवला. तिचे संपूर्ण विदर्भात कौतुक केले जात आहे.