शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद विद्यार्थ्यांना मायेची ऊब

By admin | Updated: December 20, 2015 00:24 IST

थंडीची लाट मागील आठ दिवसापासून सुरु झाली. सर्वांनीच ऊनी स्वेटर्स कपाटातून काढले.

विद्यार्थी गहीवरले : उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रममोहन भोयर तुमसर थंडीची लाट मागील आठ दिवसापासून सुरु झाली. सर्वांनीच ऊनी स्वेटर्स कपाटातून काढले. तुमसरातील एका खासगी विना अनुदानित मतिमंद शाळेतील विद्यार्थी जुन्या स्वेटर्सनीच ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. तुमसरच्या महिला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मातृत्वाची ऊब देत मतिमंद मुलांना शाळेत जाऊन स्वेटर वितरित केले. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.तुमसरातील दुर्गा कॉलनीत लुंबिनी मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. या शाळेत सुमरे ५० विद्यार्थी असून ते जन्मानेच मतिमंद आहेत. यात गरीब विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राज्य शासनाने या शाळेला अजूनपर्यंत अनुदान दिले नाही. स्वखर्चाने येथील संचालकाने शाळा चालविण्याने व्रत स्वीकारले आहे. सध्या थंडीची लाट सुरु झाली. येथील विद्यार्थ्यांकडे जुने ऊनी स्वेटर्स होते, काहींचे स्वेटर्स फाटले होते.उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ५० विद्यार्थ्यांकरिता सुमारे २० हजारांचे स्वेटर्स घेऊन त्या मतिमंद शाळेत पोहचल्या. शाळा संचालक नयन भुतांगे यांना प्रथम आश्चर्याचा धक्काच बसला. मतिमंद विद्यार्थ्यांची सोनुले यांनी आस्थेने विचारपूस केली. सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार स्वेटर्स त्यांनी वितरीत केले. प्रथम या विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांचे स्वागत केले. त्यांचे आदरातिथ्य पाहून सोनुले भारावून गेल्या. यापूर्वी सोनुले यांनी या शाळेला भेट देऊन खाद्यपदार्थ वाटप केले होते.स्वेटर्स वितरित करताना त्यात मायेची ऊब प्रकर्षाने जाणवत होती. या मातृत्वाचा प्रेमाचा झऱ्याचे विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षक शिक्षिकांनाही अनुभव आला. सुमारे दोन तास उपविभागीय अधिकारी सोनुले यांनी शाळेत घालविले. या विद्यार्थ्यांना स्पष्ट बोलता येत नाही. परंतु त्यांच्या देहबोलीतून त्यांना निश्चितच अत्यानंद झाला होता. याप्रसंगी शाळा संचालक नयन भुतांगे, मुख्याध्यापिका ममता बांगरे, सचिन मेश्राम, शिक्षिका नीता दमाहे, प्रीती रिनायत, पंडेले, दिनेश देशभ्रतार, दिनेश भुतांगे, सचिन बांगरे, कृष्णा रोकडे, नरेंद्र थोटे उपस्थित होते.