शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार मागासवर्गीय विरोधी

By admin | Updated: August 18, 2016 00:17 IST

भाजप केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून मागासवर्गीय, दलीत व महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.

गायकवाड यांची पत्रपरिषद : पुणे येथे राज्यस्तरीय मेळावाभंडारा : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून मागासवर्गीय, दलीत व महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. जातीयवादी प्रकरणांना खतपाणी घालुन समाजात तेढ निर्माण केला जात आहे. दलित व मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रकारही सुरू आहे. हा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. भाजप सरकार हे मागासवर्गीय विरोधी आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी राकॉचे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रवक्ता अतुल लोंढे, राकाँचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, डॉ. रविंद्र वानखेडे, प्राचार्य सच्चिदानंद फुलेकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. गायकवाड म्हणाले, भाजपच्या राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही. देशातील जे वातावरण चांगले नाही. सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे. नागरिकांवर हिंदुत्ववादी विचारसरणी लादली जात आहे. ही दलित व मुस्लिमविरोधी निती असल्याचेही अ‍ॅड. गायकवाड म्हणाले. गुजरातमध्ये दलितांवर अन्याय केला जात आहे. मुंबई येथे निर्माण करण्यात येणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचे स्मारक एकात्मिक घटक योजनेतून करण्यात येत आहे. स्मारक निश्चितपणे झालेच पाहिजे, परंतु त्यासाठी विशेष निधीची तरतूद का करण्यात आली नाही. मागासवर्गीयांया कल्याणासाठी असलेला निधी स्मारकासाठी वळते करण्याचा कुटील डाव शासनाने खेळला आहे. यासारख्या अन्य समस्यांवर उपाय म्हणून मागासवर्गीयांना सत्तेत सहभागी करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यस्तरीय जनजागृती अंतर्गत राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. भंडारा येथेही १७ आॅगस्टला मेळावा आजोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून आगामी नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात पुरोगामी विचार व फुले, आबेंडकरी चळवळीला सोबत घेऊन बहुजनविरोधी सरकारला धडा शिकविण्यात येईल. यात सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राकाँचे प्रतिनिधी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहितीही अ‍ॅड. गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)