पालांदूर येथे सायकल दुरुस्तीचे दुकान भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:05+5:302021-02-05T08:40:05+5:30

पालांदूर : सायकल दुरुस्तीच्या दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे गुरुवारी सकाळी ...

Bicycle repair shop burnt at Palandur | पालांदूर येथे सायकल दुरुस्तीचे दुकान भस्मसात

पालांदूर येथे सायकल दुरुस्तीचे दुकान भस्मसात

पालांदूर : सायकल दुरुस्तीच्या दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत ५७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पालांदूर येथे एका झोपडीत कृष्णा पंढरी बोकडे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. गत १० वर्षांपासून ते दुकान चालवीत आहेत. गुरुवारी सकाळी या दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यावरून नागरिकांनी आरडाओरड केला. गावकऱ्यांनी धाव घेत मिळेल तेथून पाणी आणत आग आटोक्यात आणली. या आगीची माहिती वीज वितरण कंपनी, तलाठी आणि पालांदूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. तलाठ्याने पंचनामा करून आगीत ५७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काहींच्या मते, आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कृष्णा बोकडे गत १० वर्षांपासून उदरनिर्वाह या सायकल दुरुस्तीच्या दुकानावर करीत होता. मात्र गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानच बेचिराख झाले. त्यामुळे त्याच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्ताला तात्काळ मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Bicycle repair shop burnt at Palandur