शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जागतिक आकर्षणाचे केंद्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आसती, व्यवस्थापक नरेश वड्डेटीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने वाहतूक होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात महामार्गचा विस्तार केला जात आहे. सोबतच पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्याचे कार्य सरकार करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही विविध विकास कामे सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द धरणात वाटरपार्क, वाटरस्पोर्ट, बोटिंग, लॉजिस्टीक पार्क, तरंगते रेस्टारंट आदी प्रकल्प तयार करण्याची योजना आहे. लवकरच भंडारा जिल्हा जागतिक आकर्षणाचे केंद्र होईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आसती, व्यवस्थापक नरेश वड्डेटीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने वाहतूक होईल. आपण आंभोरा पुलाची पाहणी केली. क्रेनमधून वर गेलो तेव्हा तेथील दृश्य पाहून हे स्थळ उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकास करता येईल, असे जाणवले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे विविध योजना राबविण्याची आपली तयारी आहे. भंडारा शहरापासून आंभोरापर्यंत बोटींगची सुविधा करण्याचा मानस असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यांनी मार्गदर्शन केले.   प्रास्ताविक महामार्ग प्राधीकरणाचे आशिष असाटी यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार एन. एल. येवतकर यांनी मानले. कार्यक्रमाला माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशिवार, चरण वाघमारे, रामकृष्ण अवसरे, हेमकृष्ण कापगते, भाजप अध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, भगवान हरडे, गिरोलाचे सरपंच भजन भोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

काळे झेंडे दाखवा पण योग्य ठिकाणी- पवनी रस्त्याचे काम वनविभागामुळे तीन वर्षांपासून रखडले आहे. काँग्रेसने आज मला काळे झेंडे दाखिवले. याचे दु:ख नाही. परंतु योग्य ठिकाणी दाखवा, असा सल्ला ना. गडकरी यांनी दिला. वनविभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. मुख्यमंत्र्याकडे वनविभाग आहे. त्यांना काळे झेंडे दाखिवले तर काम होईल, असे सांगत त्यांनी वनविभागावर आपला रोष व्यक्त केला. दरम्यान भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने काँग्रेसच्यावतीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पवनी येथे स्थानबद्ध केले होते.  

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी