शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

बपेरा आंतरराज्यीय सीमेवर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहराच्या सीमाही बंद : पोलिसांकडून तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी कायदा लागू झाला आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा येथील आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आंतरराज्यीय सीमा बंद करण्यात आले आहे. तिरोडा शहराच्या सीमा देखील बंद होणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
गावपातळीवर पोलीस पाटलांच्या मदतीने सरपंच, पोलीस कर्मचारी संचारबंदीबद्दल लोकांना मार्गदर्शन करीत आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराची सीमा सिमेलगत तुमसर शहर येत असल्याने मार्गावरील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते. गत आठवड्यात मध्यप्रदेशातील काही मजूरवर्ग पुणे, औरंगाबाद येथून परतल्याने सिहोरा परिसरातील नागरिकानी भीती व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बपेरा आंतरराज्यीय सीमा सील करण्यात आली आहे. सकाळी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनाची वार्दळ कमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचा धरण मार्ग बंद करण्यात आलेला नाही. मात्र मार्गावर बॅरिकेट लावण्यात येणार आहेत. परिसरातील गावाचे शेजारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कवलेवाडा धरण मार्गावरून नागरिकांची अद्यापही वर्दळ आहे. सायंकाळ होताच धरण मार्गावरून रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर रांगा दिसून येत आहेत.
कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. मात्र तरी देखील रेतीचा उपसा सुरू असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजेपेक्षा रेती वाहतूक महत्वाची आहे का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे.
वांगी-मांडवी गावातून दररोज ३० ते ४० ट्रक धरण मार्गाने दाखल होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून धरण मार्ग देखील कायमस्वरूपी सील करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

लग्नाच्या तारखात वाढ
नागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्यासाठी परिसरातील ४० ते ५० वधू-वरांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अन्य वास्तूशांती, साक्षगंध, धार्मिक कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अपवादात्मक परिस्थिती लग्नासाठी १० ते १५ नातेवाईकांची काही काळानंतर उपस्थिती राहणार आहे. कोरोना वासरसच्या भीतीमुळे अनोळखी इसमांना गावातून हाकलून लावण्यात येत आहे. जिल्हा बाहेरून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या