शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शास्री विद्यालयाचे बॅंडपथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

भंडारा : सुमधुर स्वरात गायलेले राष्ट्रगीत, तितकेच समर्पक समूह गीत, सुसज्ज बॅंडपथक, आकर्षक गणवेशातली मुलं, शिक्षक वर्ग.. जि.प.च्या मुख्य ...

भंडारा : सुमधुर स्वरात गायलेले राष्ट्रगीत, तितकेच समर्पक समूह गीत, सुसज्ज बॅंडपथक, आकर्षक गणवेशातली मुलं, शिक्षक वर्ग.. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रीय सणांना लालबहादूर शास्री विद्यालयाचे पथक जि. प.च्या प्रांगणात राष्ट्रगीतासाठी निमंत्रित केले जाते. गेल्या १७ वर्षांपासून मुलांना सन्मानाने निमंत्रण देण्याची प्रथा जि.प. च्या सामान्य प्रशासन विभागानेही सुरू ठेवली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या प्रांगणात येऊन क्षण अनुभवणारे विद्यार्थीही कमी नाहीत. पाचवी व सहावीच्या बालवयातली ही मुलं मोठी झाली. शिक्षण व नोकरीनिमित्त बाहेरच्या शहरात गेली. पण राष्ट्रभावनेचा तो क्षण पुन्हा वाट्याला यावा, असे प्रत्येकाला वाटतेच. शहरात उच्चशिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांत आकांक्षा साठवणे, मयुरी खलशिंगे, मयुरी वैद्य, चाहूल नागपुरे, अमेय डोंगरे, अभिषेक शहाणे, आशिष रामटेके, सौरभ जांभूळकर, पीयूष निचत, संपदा वझलवार, वेदांत रामेकर, मृणाल पवनकर, चंदन साखरकर, वैभवी पाटील, पीयूष वंजारी अशा एक नव्हे अनेक विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. राष्ट्राच्या सन्मानार्थ आयुष्यात पुन्हा एकदा या प्रांगणात आम्हाला राष्ट्रगीत गायला मिळावे, अशी भावना व्यक्त करताना माजी विद्यार्थिनी मयुरी खलशिंगे भावुक झाली होती.

प्राचार्या केशर बोकडे म्हणाल्या, शालेयवयात अनुभवलेले क्षण मुलं विसरत नाहीत. त्या आठवणींची शिदोरी घेऊनच मुले नंतरचा प्रवास करतात. त्या क्षणांना, आठवणींना उजाळा देऊन शाळेविषयी मुलांना असणारे प्रेम कायम टिकवून ठेवणे हेच सद्य:स्थितीतल्या शालेय घटकाचे कर्तव्य आहे.

१७ वर्षांपूर्वी काळात केलेले प्रयत्न व मेहनतीचे फळ आताच्या पिढीलाही मिळताय. हा सन्मान या विद्यार्थ्यांचाच नाही तर इतिहासकालीन मन्रो शाळेच्या वास्तूचाही आहे, असे मत शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी व्यक्त केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या या पथकासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामू शहारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग उपस्थित होता.