जिल्ह्यातील पहिले आसाम पॅटर्नचे बांबू हट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:28+5:30

पर्यटकांना विश्रांतीसह सुसज्ज निवाऱ्याची सोय उपलबध व्हावी या हेतूने ४५.२० लाखांच्या चार बांबू हट प्रकल्प बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परंतु कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले होते. बरेच दिवस काम रखडले होते. अखेर मार्च २०२० मध्ये उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या प्रयत्नाने सदर बांधकाम पूर्ण करण्यात आले असून वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

Awaiting the inauguration of the first Assam pattern bamboo hut in the district | जिल्ह्यातील पहिले आसाम पॅटर्नचे बांबू हट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील पहिले आसाम पॅटर्नचे बांबू हट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देकोका विश्राम परिसरात प्रकल्प पूर्ण : तर पर्यटक अनुभवणार निसर्गाचा सहवास

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका येथे तीन वर्षापुर्वी प्रादेशिक वनविभागाच्या वतीने आसाम धर्तीवर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच पर्यटकांना विश्रांतीसह सुसज्ज निवाऱ्याची सोय उपलबध व्हावी या हेतूने ४५.२० लाखांच्या चार बांबू हट प्रकल्प बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परंतु कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले होते. बरेच दिवस काम रखडले होते. अखेर मार्च २०२० मध्ये उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या प्रयत्नाने सदर बांधकाम पूर्ण करण्यात आले असून वास्तू उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
सन २०१७-१८ मध्ये कोका अभयारण्यात पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नैसर्गीक वातावरणात राहण्याचा आनंद उपभोगता यावा, परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थानिकांचा सहभाग वाढावा या हेतूने कोका येथे आसाम प्रकल्पावर आधारित बांबू हट निर्मातीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. कामाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले होते.
परंतु काही कारणांमुळे सदर कामाचा कंत्राट फरीदाबाद येथील कंपनीला देण्यात आला.
दुसरीकडे वनप्रशासन व कंत्राटदार यांच्या कचाट्यात बांधकाम सापडले होते. त्यामुळे कामे बंद पडून पावसाचे पाणी बांबू कॉटेजमध्ये शिरून लाकडी फर्नीचरचे नुकसान झाले. लाकडे काळसर पडली. शिवाय अस्वच्छतेमुळे वाळवी लागण्याचा व लाकडे सडण्याचा धोका संभवत होता.
अपूर्ण कामांमुळे ज्या हेतूने प्रकल्पावर खर्च करण्यात आला. तो हेतूच नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे अखेर उपवनसंरक्षक यांनी पुढाकार घेत नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करून बांधकाम मार्च महिन्यात सुरू केले. तीन महिन्याच्या कालावधीत कामे पूर्ण झाली असून आता प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

आसाम राज्यातील बांबू कामगार कार्यरत
आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते.सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्वर कोका येथे तर दोन स्ट्रॅक्वर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते. कोका येथे प्रत्येकी ३.६० लाख अंदाज पत्रकीय लहान स्वरूपात दोन बांबू हट, प्रत्येकी १९ लाख अंदाजपत्रकीय दोन मोठे कॉटेज व कॉरमेंट्री यांचा समावेश आहे. अंदाजपत्रकीय ४५.२० लाखांची कामे वर्षभरात पूर्ण करायची होती. तीन वर्षांनंतरही कामे पूर्ण न झाल्याने तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता असमाधानकारक दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले.

Web Title: Awaiting the inauguration of the first Assam pattern bamboo hut in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.