शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

समिती मार्केट यार्डवर धानाची आवक

By admin | Updated: September 27, 2016 00:35 IST

खरीप हंगामात लागवड केलेल्या धान पिकाची लगेच कापणी व मळणीला तालुक्यात सुरुवात होऊन...

शेतकऱ्यांचा सत्कार : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार तुमसर : खरीप हंगामात लागवड केलेल्या धान पिकाची लगेच कापणी व मळणीला तालुक्यात सुरुवात होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर विक्रीकरिता नविन धानाची आवक सुरु झाली आहे. या हंगामातील नविन धानपिकाचे शेतमाल घेवून येणारे प्रथम शेतकरी धनंजय रामकृष्ण गुरवे रा. उमरवाडा, दुलिचंद बिसने, रा. देवसर्रा या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्याद्वारे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.गतवर्षी पडलेल्या दुष्काळ व यावर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेने ग्रासला होता. मात्र वेळोवेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे धान पिकाचे उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे हंगामपूर्ण होण्याआधीच प्रगत शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी करुन तो धान बाजार समितीत विक्री आणने सुरुवात केली आहे. त्यातील प्रथम इरलेले शेतकरी धनंजय गुरवे यांनी श्री लक्ष्मी व्हेरायटीचे ४० बोरे धान अडते अनिल निखाडे यांच्या अडतमध्ये दुर्गा राईस मिल यांनी १,७७६ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केले. तर दुलिचंद बिसने या शेतकऱ्याने १,०१० व्हेरायटीचे ५ बोरे धान अडते सचिन न्यायखोर यांचे अडतमध्ये राकेश खंडेलवाल या व्यापाऱ्यानी खरेदी केले. यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती भाऊराव तुमसरे संचालक अनिल जिभकाटे, खुमनलाल चौधरी, अनिल भोयर, अनिल निखाडे, वसंत बालपांडे, दुलिचंद निखाडे, भाष्कर ढेंगे, संजय मेश्राम, मनिष मेश्राम, क्रिष्णा मोटघरे, रामप्रसाद बघेले, राजकुमार कहालकर, दिगंबर समरीत, शंकर निमकर, राहुल पंचभाई व समितीचे हमाल, मापारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)