शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला रूग्णालयाला मंजूरी

By admin | Updated: June 11, 2017 00:15 IST

येथील बहूप्रतिक्षित महिला रूग्णालयाला अखेर ६ जूनला मंजूरी मिळाली आहे.

नरेंद्र भोंडेकर यांची माहिती : ४४ कोटींचा खर्च अपेक्षित, महिनाभरात भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील बहूप्रतिक्षित महिला रूग्णालयाला अखेर ६ जूनला मंजूरी मिळाली आहे. उच्चस्तरीय समितीने या रूग्णालयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असून यासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर केले आहे. यातून सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार असून याचे उद्घाटन महिनाभरात करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शनिवारला पत्रपरिषदेत दिली. महिला रूग्णांना सुविधा मिळाव्या यासाठी भंडारा येथे महिला रूग्णालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वेळोवळी हा मुद्दा रेटून धरला. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे महिला रूग्णालयाचा प्रस्ताव थंडबस्त्यात होता. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. ५ कोटींवरील निधीच्या बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आला होता. यासाठी नरेंद्र भोंडेकर यांनी हा मुद्दा पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या माध्यमातून शासनाकडे लावून धरला होता. या रूग्णायलासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर करण्यात आलेले आहे. रूग्णालयाचे भूमिपूजन महिनाभरात होणार असल्याचीही माहिती भोंडेकर यांनी यावेळी दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती ललीत बोंद्रे, शहरप्रमुख सुर्यकांत इलमे, अनिल गायधनी, सुरेश धुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.पवनी रूग्णालयाचा मार्ग मोकळापवनी येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथे उपजिल्हा रूग्णालयाची मागणी करण्यात येत होती. हे रूग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी पूर्ण करण्यात आलेल्या आहे. येत्या दोन-तीन दिवसात पवनी रूग्णालयाचा मार्ग मोकळा होत आहे.विरोधकांमुळे मिळाले प्रोत्साहनमहिला रूग्णालयाला मंजूरी नाही किंवा त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रस्ताव बारगडला, असे नेहमी विरोधकांनी वावळ्या उठविल्या. यामुळे खचून न जाता त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे रूग्णालयासाठी धावपाळ केली. वावळ्यांमुळे जिद्दीने कामाला लागलो, ते आता पूर्णत्वास येत आहे.