शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिघोरीत उभ्या धान पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यात यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे धानपीक क्षतीग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच धानावर करपा, कडाकरपा आदी किडींचा प्रादूर्भाव वाढत गेला. आता खोडकिडीने डोके वर काढले आहे.

ठळक मुद्देखोडकिड्यांचा प्रादूर्भाव : लॉकडाऊनने कीड नियंत्रणाला मजूर मिळेना

दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना प्रादूर्भावाच्या सावटात धान पिकावर मोठ्या प्रमाणात खोडकिडीने आक्रमण केले आहे. लॉकडाऊनने किड नियंत्रणासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लाखांदूर तालुक्याच्या दिघोरी येथील एका शेतकऱ्याने चक्क धानाच्या पिकात जनावरे सोडली.
लाखांदूर तालुक्यात यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे धानपीक क्षतीग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच धानावर करपा, कडाकरपा आदी किडींचा प्रादूर्भाव वाढत गेला. आता खोडकिडीने डोके वर काढले आहे.
कीड नियंत्रण करणे आवश्यक असताना कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले. एकीकडे मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे खोडकीड धान उद्ध्वस्त करीत आहे. निसवा होऊन लोंबी आलेल्या धानावर किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. हजारो रुपये खर्च करुनही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

एकरी ४० हजार मदत द्या
खोडकिडीने दिघोरी व बारव्हा परिसरातील उन्हाळी धान शेती बाधीत झाली आहे. उन्हाळी धानाचा निसवा होऊनही लोंब्या भरल्या नसल्याने हातात काही येण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ऐकरी ४० हजार रुपये मदत जाहिर करावी, अशी मागणी लाखांदूर पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती