शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अन् चोरीस गेलेले दागिने वृद्धेला मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदेवसर्राची महिला । सिहोरा पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकदा चोरीस गेलेले दागिने पुन्हा मिळण्याची कुणालाही आशा नसते. अनेकदा तर पोलिसात तक्रारही केली जात नाही. मात्र सिहोरा पोलिसांनी एका वृद्धेचे चोरीस गेलेले दागिने दोन वर्षानंतर परत मिळाले. पोलिसांच्या ताब्यातील दागिने घेताना वृद्धेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलिसांप्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला.सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत देवसर्रा येथे शांताबाई सदाशिव बिसने (७०) राहतात. २०१७ मध्ये त्या सीतेपार येथील शेतात कामाला गेल्या होत्या. त्यावेळी अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र धारदार वस्तूने कापून लंपास केले होते. त्यावेळी शांताबाईने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मंगळसुत्रातील ८ मणी व १२ गोल मणी जप्त केले. पोलिसांनी सदर प्रकरणी तुमसर न्यायालयाचा आदेश मिळविला. त्यानंतर शांताबाईला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंह बिसेन आणि ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांच्या उपस्थितीत सदर वृद्धेच्या दागिने सुपूर्द करण्यात आले. दोन वर्षापूर्वी चोरीस गेलेले दागिने आपल्याला परत मिळणार नाहीत अशी तिला खात्री होती. परंतु पोलिसांच्या प्रयत्नातून दागिने मिळाले. दागिने स्वीकारताना तिच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. पोलिसांनी मनावर घेतले तर कोणत्याही प्रकरणाचा छडा लावू शकतात हेच यातून सिद्ध झाले.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस