नदीपात्रात भग्नावस्थेतील सापडली प्राचीन मूर्ती ; कोणत्या काळातील आणि ऐतिहासिक संदर्भ काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:56 IST2026-05-08T12:55:02+5:302026-05-08T12:56:52+5:30

Bhandara : शतकानुशतके इतिहासाच्या खुणा आपल्या कुशीत जपणाऱ्या वैनगंगा नदीने पुन्हा एकदा भूतकाळाचे दार उघडले आहे. पवनी तालुक्यातील वलनी येथे नदीच्या वाळूत प्राचीन आणि दुर्मीळ पाषाण मूर्ती आढळून आल्याने इतिहासप्रेमी व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ancient stone idol found in ruins in a riverbed; What is the period and historical context? | नदीपात्रात भग्नावस्थेतील सापडली प्राचीन मूर्ती ; कोणत्या काळातील आणि ऐतिहासिक संदर्भ काय ?

Ancient stone idol found in ruins in a riverbed; What is the period and historical context?

लोकमत न्यूज नेटवर्क
वलनी (जि. भंडारा):
शतकानुशतके इतिहासाच्या खुणा आपल्या कुशीत जपणाऱ्या वैनगंगा नदीने पुन्हा एकदा भूतकाळाचे दार उघडले आहे. पवनी तालुक्यातील वलनी येथे नदीच्या वाळूत प्राचीन आणि दुर्मीळ पाषाण मूर्ती आढळून आल्याने इतिहासप्रेमी व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या कलाकृतीमुळे परिसराच्या ऐतिहासिक वारशाविषयी नव्याने चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वीसुद्धा जानेवारी महिन्यात याच नदीपात्रात भग्नावस्थेतील एक मूर्ती सापडली होती.

पाणी ओसरल्याने आणि वाळू उपशामुळे वलनी येथील वैनगंगा नदीच्या पात्राचा काही भाग उघडा पडला होता. यादरम्यान, काही स्थानिक नागरिकांना वाळूमध्ये एक कोरीव पाषाण दिसला. कुतूहलापोटी तो बाहेर काढला असता, त्यावर एका योद्ध्याची किंवा देवतेची रेखीव मुद्रा कोरली असल्याचे आढळून आले. सापडलेली मूर्ती एका मोठ्या अखंड पाषाणखंडावर कोरलेली आहे. ही आकृती एका विशिष्ट 'वीर' मुद्रेत असून, एका हातात शस्त्र (कदाचित ढाल किंवा तलवारसदृश वस्तू) धारण केल्याचे दिसून येते. मूर्तीची ठेवण आणि त्यावरील कोरीव काम हे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा नमुना असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते. पवनी तालुका हा मुळातच ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग आहे. येथे अनेकदा मौर्यकालीन आणि सातवाहनकालीन अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे ही मूर्तीदेखील त्याच काळातील किंवा मध्ययुगीन काळातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मूर्तीचे शास्त्रीय परीक्षण आवश्यक

पवनीचा समृद्ध असा एक इतिहास आहे. वैनगंगा नदीच्या काठी अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा दडलेल्या आहेत. या मूर्तीचे शास्त्रीय परीक्षण केल्यास ती कोणत्या काळातील आहे आणि तिचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, हे स्पष्ट होऊ शकेल. सध्या ही मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात आली असून, यातून कोणता नवा इतिहास उजेडात येतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : नदी में मिली प्राचीन मूर्ति: युग अज्ञात, ऐतिहासिक महत्व?

Web Summary : वलनी के पास वैनगंगा नदी में एक प्राचीन पत्थर की मूर्ति मिली। योद्धा को दर्शाती यह मूर्ति ऐतिहासिक रुचि जगाती है। इसी तरह की खोजें मौर्य या सातवाहन मूल की संभावना का सुझाव देती हैं। इसकी उम्र और ऐतिहासिक संदर्भ निर्धारित करने के लिए वैज्ञानिक विश्लेषण की आवश्यकता है।

Web Title : Ancient Idol Found in Riverbed: Era Unknown, Historical Significance?

Web Summary : An ancient stone idol was discovered in the Wainganga riverbed near Valni. The sculpture, depicting a warrior, sparks historical interest. Similar finds suggest possible Maurya or Satavahana origins. Scientific analysis is needed to determine its age and historical context.