शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर रुग्णवाहिका चालकांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

शासकीय रुग्णवाहिका वाहनावर मागील १० ते १५ वर्षांपासून शासनाच्या विविध कार्यप्रणालीने वाहन चालक या पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्तीने रुग्णवाहिका चालक सेवेत कार्यरत होते.  राज्य स्तरावरुन या योजनांतर्गत नियुक्ती थांबवून राज्य स्तरावरुन बाह्यस्रोत एजन्सीमार्फत आजतागायत यांनी सेवा दिली. कार्यरत आहेत. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई आयुक्त तथा संचालक यांच्यामार्फत सन २०२२ - २०२३पासून तीन वर्षांकरिता वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट विभागनिहाय विविध संस्थेला दिले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दीड दशकापासून इमानेइतबारे जिल्हा आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या १०२ रुग्णवाहिका चालकांना विनाशर्ती, अटीने कामावर पूर्ववत घ्यावे, ही प्रमुख मागणीसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर नवजीवन रुग्णवाहिका संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभागृहात खासदार सुनील मेंढे, सीईओ विनय मून, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर यांच्याशी चर्चेतून मिळालेल्या आश्वासनानंतर रुग्णवाहिका चालकांनी आंदोलन मागे घेतले.शासकीय रुग्णवाहिका वाहनावर मागील १० ते १५ वर्षांपासून शासनाच्या विविध कार्यप्रणालीने वाहन चालक या पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्तीने रुग्णवाहिका चालक सेवेत कार्यरत होते.  राज्य स्तरावरुन या योजनांतर्गत नियुक्ती थांबवून राज्य स्तरावरुन बाह्यस्रोत एजन्सीमार्फत आजतागायत यांनी सेवा दिली. कार्यरत आहेत. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई आयुक्त तथा संचालक यांच्यामार्फत सन २०२२ - २०२३पासून तीन वर्षांकरिता वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट विभागनिहाय विविध संस्थेला दिले आहे. त्यामध्ये वर्ग १०वी पास, उंची १६० से. मी. हे वाहन चालकांसाठी निकष लावून दिले आहेत. १० ते १५ वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या वाहन चालकांवर हे निकष अन्यायकारक आहेत. तसेच यापूर्वी तत्कालीन आयुक्त यांनी मागील वर्षी नेमलेल्या कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारचे शिक्षणाची व उंचीबाबत शर्ती, अटी न ठेवता कार्यरत असलेल्या वाहन चालकांना कर्तव्यावर ठेवण्याबाबतचे कंत्राट देतानाच आदेशित केले होते. त्यामुळे विद्यमान रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली नाही.  आजपर्यंत  सेवेत कार्यरत असताना आता हा अन्याय का? असा प्रश्न या रुग्णवाहिका चालकांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निवड समितीमार्फत ११ महिन्यांच्या नियुक्ती आदेशानुसार दोन ते अडीच वर्षे सेवा व त्यानंतर राज्य स्तरावरुन नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सेवा दिली.  परंतु आयुक्त यांनी नवनियुक्त कंत्राटदाराला दिलेले १५ फेब्रुवारी २०२२मधील वर्कऑर्डरमधील निकष हे अन्यायकारक आहेत. पूर्वीप्रमाणे कामावर ठेवण्यात यावे, याबाबतचे निर्देश देण्यात यावे, अन्यथा परिवारासह  आत्महत्या करू, असा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.  विष प्राशन, जलसमाधी घेऊन प्राणज्योत संपविण्याशिवाय दुसरे कोणतेही साधन राहणार नाही.

 

टॅग्स :agitationआंदोलन