शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग झाला ‘पंगू’

By admin | Updated: January 12, 2015 22:45 IST

येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लाखांदूर : येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांच्या लाभाच्या अनेक महत्वपूर्ण योजना यापूर्वी राबविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व योजनांचा लाभ मिळत होता. पंरतु शासनाने यात मोठे बदल घडवून आणून पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या कृषि अभियांत्रीकीकरण योजना, राज्य पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजना, कडधान्य विकास कार्यक्रम योजना, गळीत धान्य विकास कार्यक्रम योजना व इतर योजना ह्या तालुका कृषि विभागाकडे वळविण्यात आल्या. यातून बियाणे वाटप, शेती उपयोगी औजारे वाटप, ताडपत्री वाटप तसेच शेतपिकांसदर्भात अनेक महत्वाच्या योजना वर्ग करण्यात आले आहेत. आता पंचायत समिती कृषि विभागाकडे कुठलेच महत्वाचे कृषि विषयक काम उरले नसल्याने कृषि विभाग पंगू झाल्याचे दिसत आहे.तालुका कृषि विभागाकडे यापूर्वी शेतकऱ्यांसदर्भात कुठल्याच प्रकारच्या योजना वा संबंध येत नसल्याने हा विभाग शेतकऱ्यांपासून अलिप्त मानल्या जात होता. आता सर्व कृषि विषयक योजना या विभागाकडे देण्यात आल्या असल्या तरी शेतकरी वर्गात तिव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषि विभागाकडेच त्या योजना पूर्ववत कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अप्पर आयुक्त विस्तार कृषि विभाग भारत सरकार दिल्ली यांनी नुकतीच लाखांदूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषि विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी आत्मा संघटनेचे सदस्य तथा शेतकरी भाऊ रामटेके यांनी अप्पर आयुक्तांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती कृषि विभागाकडे योजना पूर्ववत करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी सुध्दा पाठिंबा देऊन मागणी रेटून धरली होती. (तालुका प्रतिनिधी)