शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

देयक न पाठविता बंद केले कृषीपंप

By admin | Updated: August 18, 2016 00:20 IST

कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.

वीज मंडळाची अरेरावी : शेतकऱ्यांवर अस्मानी संकटभंडारा : कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कनिष्ठ अभियंता व लाईनमेनच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून न्याय कुणाला मागायचा असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत असे की, धारगाव फिडर अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा येथील अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा लाईनमेननी खंडीत केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. अनेकदा या विषयी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. अखेर २० दिवसानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार का केली म्हणून रुखमा लांजेवार या महिला शेतकऱ्याचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत करण्यात आला. सदर शेतकऱ्याच्या कृषी पंपाची दीड महिन्यापूर्वी वीज जोडणी करण्यात आली. केवळ दीड महिना लोटला असताना त्याचे देयक सुद्धा पाठविण्यात आले नाही. देयक पाठविले नसताना देयक भरण्याचे अधिकारी सांगत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचे वीज जोडणी खंडीत न करता हेतुपुरस्सर एका महिला शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. लाईनमेन जांगडे व त्याचा सहकारी सोनकुसरे यांनी हा प्रकार हेतुपुरस्सर केल्याचा आरोप आहे. बेजवाबदार कर्मचाऱ्यावर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी महिला शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान मंगळवार रोजी जवळपास १० शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. वरिष्ठांच्या आदेशानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून लांजेवार यांचा वीज प्रवाह खांबावरून बंद करण्यात आला. लाईनमेन व त्याचे सहकारी यांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे कृषीपंप धारकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी उर्जामंत्री सोबत असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे त्यांच्या अधिनस्थ असलेले अधिकारी - कर्मचारी मात्र शेतकऱ्यांची गळचेपी करीत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)