शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वाचनालयाचा करारनामा नियमानुसार

By admin | Updated: August 31, 2015 00:27 IST

स्वातंत्र्यपूर्व काळातील नगरपरिषद विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची इमारत जीर्ण झाली होती. इमारतीमुळे इमारतीखालील दुकानदारांचा जीव धोक्यात आला होता.

७५ वर्षांची जुनी इमारत : अभिषेक कारेमोरे यांची पत्रपरिषदेत माहितीतुमसर : स्वातंत्र्यपूर्व काळातील नगरपरिषद विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची इमारत जीर्ण झाली होती. इमारतीमुळे इमारतीखालील दुकानदारांचा जीव धोक्यात आला होता. नगरपरिषदेची उत्पन्न वाढ व सुरक्षितता लक्षात घेऊन लिलाव पद्धतीने निविदा काढून व २१ नगरपरिषद सदस्यांनी ठरावाला मंजुरी दिल्यावर करारनामा करण्यात आला, अशी माहिती नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.नगरपरिषदेसमोर स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची जीर्ण इमारत आहे. या इमारतीला ७५ वर्षे झाली आहे. इमारतीखाली अस्थायी भाडेकरुंनी तत्कालीन मुख्याधिकारी ए.आर. सातपुते यांचेकडे पाणी गळण्याची तक्रार केली होती. माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे यांचे कार्यकाळात नवीन सार्वजनिक वाचनालयाची इमारत तयार करण्यात आली होती. नवीन इमारतीत वाचनालयाचे स्थानांतरण आठ महिन्यापूर्वीच झाले. ९ जुलै २०१५ ला जाहीर लिलावाकरिता निविदा देण्यात आली. शासन निर्णयाप्रमाणे परिगणना तक्त्यानुसार ७५.४४ ची अधिमुल्य रक्कम (नपरतावा) ३,६८,००० निश्चित करण्यात आली. तथा त्याचे मासिक भाडे ५,२१४ रुपये ठरविण्यात आले. एवढी रक्कम आजपावेतो तुमसर नगरपरिषदेत ठरविली गेली नाही.१७ जुलै रोजी नगरपरिषद सभागृहात लिलाव प्रक्रियेस सुरुवात झाली. यात नऊ लिलावधारक उपस्थित होते. त्यातून केवळ धारकांनी भाग घेतला. त्यांनी नियमाप्रमाणे २५ हजार प्रमाणे प्रत्येकांनी अमानत रक्कम भरली. यात केशव खोब्रागडे, शंकर निखाडे, देवेंद्र जवरानी, दिनेश जवरानी यांचा समावेश आहे. अंतिम बोली ३,७४,००० चे वर कुणीही बोली बोलली नही. त्यामुळे दिनेश जवरानी यांनी ३,७४००० मध्ये केवळ तीन वर्षाकरिता अस्थायी पट्यांवर इमारत देण्यात आली. ३,९९,००० नगरपरिषदेत जमा करण्यात आले. नगरपरिषद सर्वसाधारण सभेत २० जुलै रोजी ठराव क्रमांक ९ अन्वये २१ नगरपरिषद सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिल्यावर करारनामा कारवाई करण्यात आली. ४० लाखात इमारत विकल्याचा आरोप बिनबुडाचा व निराधार आहे. नियमानुसार ही सर्व कारवाई झाली असे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष सरोज भुरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे तथा नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)