मोहिनी देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबावर गुन्हा; अंनिसच्या तक्रारीनंतर अड्याळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:20 IST2026-05-11T15:18:00+5:302026-05-11T15:20:10+5:30

Bhandara : पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव (निपाणी) येथे "मोहिनी करून" मुलगी घरी आणण्याचा आणि जमिनीतील सोने काढून देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश झाला.

A case has been registered against a fake father who claimed to give Mohini; Adyal police take action after Annis' complaint | मोहिनी देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबावर गुन्हा; अंनिसच्या तक्रारीनंतर अड्याळ पोलिसांची कारवाई

A case has been registered against a fake father who claimed to give Mohini; Adyal police take action after Annis' complaint

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव (निपाणी) येथे "मोहिनी करून" मुलगी घरी आणण्याचा आणि जमिनीतील सोने काढून देण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर हेमदास किसन बावणे (५५) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे.

तक्रारीनुसार, बावणे हा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करत होता. पळून गेलेली मुलगी नक्की घरी परत येईल, तसेच तंत्र-मंत्र, वेलांची चुंबळ, पाणी आणि तांदूळ यांचा वापर करून "मोहिनी" करून देतो, असा त्याचा दावा असल्याचे समोर आले. सुरुवातीला त्याने ७,५०० ते ८ हजार रुपये, नंतर एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलीला काहीतरी होईल, अशी धमकीही त्याने दिल्याचा आरोप आहे.

या प्रकाराची तक्रार अंनिसकडे करण्यात आली. त्यानंतर अंनिसचे पदाधिकारी आणि अर्जदार यांनी अड्याळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनंजय पाटील यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ३१८ (४) आणि महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानूष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादुटोणा प्रतिबंधक कायदा २०१३चे कलम ३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

"अंनिसने केलेल्या पाठपुराव्यामुळे ढोंगीपणा उघडकीस आला. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची भीती, भावना आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा भोंदुबाबांमुळे समाजात चुकीच्या प्रथा बळावतात. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यांवर विश्वास न ठेवता तक्रार करावी आणि कायद्याचा आधार घ्यावा."
- विष्णुदास लोणारे, राज्य सहकार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती

Web Title : मोहिनी का दावा करने वाले ढोंगी बाबा पर मामला दर्ज।

Web Summary : भंडारा में एक ढोंगी बाबा, जो भागी हुई लड़कियों को वापस लाने और सोना ढूंढने का दावा करता था, का पर्दाफाश हुआ। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति की शिकायत के बाद पुलिस ने हेमदास बावन को गिरफ्तार किया। उस पर पैसे वसूलने और धमकी देने का आरोप है।

Web Title : Fake Baba promising miracles booked after complaint by anti-superstition group.

Web Summary : A fake Baba claiming to bring back runaway girls and find gold was exposed in Bhandara. Police arrested Hemdas Bawne after a complaint by Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti. He allegedly extorted money, threatening harm if demands weren't met.