लाखनी तालुक्यातील ९७ हजार २३६ नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:50+5:30

लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ९७ हजार २३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार ४८ हजार ९६७ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ४८ हजार २६९ आहे. तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सालेभाटा पंचायत समिती गणामध्ये ८ हजार १२८ मतदार, तर लाखोरी पंचायत समिती गणामध्ये ७५०४ मतदार आहेत.

97 thousand 236 citizens of Lakhni taluka will exercise their right to vote | लाखनी तालुक्यातील ९७ हजार २३६ नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

लाखनी तालुक्यातील ९७ हजार २३६ नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

googlenewsNext

चंदन मोटघरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात  जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच नगरपंचायतच्या निवडणुकीमुळे  थंडीच्या दिवसांतही राजकीय वातावरण तापले आहे. २१ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा आज शेवटचा दिवस आहे.  नगरपंचायतचे नामनिर्देशन स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे.  नामनिर्देशनपत्राची छाननी ७ डिसेंबर व नगरपंचायतची ८ डिसेंबरला छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. 
लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ९७ हजार २३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार ४८ हजार ९६७ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ४८ हजार २६९ आहे. तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सालेभाटा पंचायत समिती गणामध्ये ८ हजार १२८ मतदार, तर लाखोरी पंचायत समिती गणामध्ये ७५०४ मतदार आहेत. मुरमाडी (सावरी) जिल्हा परिषद क्षेत्रातील पिंपळगाव (सडक) पंचायत समिती गणामध्ये ८३२६ मतदार व मुरमाडी (सावरी) पंचायत समिती गणामध्ये ८३६५ मतदार  मतदान करणार आहेत. केसलवाडा (वाघ) जिल्हा परिषद क्षेत्रातील गडेगाव पंचायत समिती क्षेत्रात ७५६० मतदार व केसलवाडा (वाघ) पंचायत समिती गणात ६९३१  मतदार मतदान करतील.
पोहरा जिल्हा परिषद क्षेत्रातील पोहरा पंचायत समिती क्षेत्रात ७६१९ व कनेरी (दगडी) पंचायत समिती क्षेत्रातील  ८७२५ मतदार मतदान करणार आहेत. 
मुरमाडी (तुपकर) जिल्हा परिषद क्षेत्रातील मुरमाडी (तुपकर) पंचायत समिती क्षेत्रात ८४९० मतदार व मेंढा (टोला) पंचायत समिती  गणात ८१५५  मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालांदूर (चौरास) जिल्हा परिषद क्षेत्रात किटाडी पंचायत समिती क्षेत्रात ८८३३ मतदार व पालांदूर (चौ.) पंचायत समिती क्षेत्रात ८६०० मतदार मतदान करणार आहेत. 
तालुक्यातील ६ जिल्हा परिषद क्षेत्र व १२ पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणुकीत लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रात १८, मुरमाडी (सावरी) ९, केसलवाडा (वाघ) १४, पोहरा २०, मुरमाडी (तुपकर) १८, पालांदूर (चौ.) २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ७१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
लाखनी नगरपंचायतमध्ये १२ हजार ५९१ मतदार
- लाखनी नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबरला लाखनी शहरातील १७ प्रभागांमध्ये पार पडणार आहे. १९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ४ करिता दोन पोलिंग बुथ ठेवण्यात आले आहेत. इतर १५ प्रभागांसाठी प्रत्येकी एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. नगरपंचायतमध्ये १२ हजार ५९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या ६४४७ आहे. पुरुष मतदारांची संख्या ६१४४ आहे.         नगरपंचायत निवडणुकीत महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.

 

Web Title: 97 thousand 236 citizens of Lakhni taluka will exercise their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.