शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

९५ हजारांची चोरी; चार तासांत चोरटा गजाआड

By admin | Updated: February 27, 2015 00:29 IST

राईस मिलमधून ९५ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या राईस मिलमधील मजुराला ग्रामीण कारधा पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली.

भंडारा : राईस मिलमधून ९५ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या राईस मिलमधील मजुराला ग्रामीण कारधा पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार खंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालगाव येथे तिरूपती राईस मिल चेतिराम हटवार रा. मानेगाव/बाजार यांच्या मालकीची आहे. या राईस मिलचे संपूर्ण आर्थिक व्यवहार हटवार यांचा भाचा दिनेश रेवतकर पाहतात. १७ फेबु्रवारी रोजी महाशिवरात्रीनिमीत्त त्यांनी मिलमधील सर्व मजुरांना सुटी दिली व सकाळी सर्व मजुरांच्या उपस्थितीत मिलला कुलूप लावून यात्रेसाठी निघून गेले. रात्री यात्रेवरून परत आल्यानंतर दिनेश रेवतकर हे मिलमध्ये आले असता त्यांना मिलचे शटर तुटून उघडलेले दिसले. तसेच मिलमध्ये असलेली ९५ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच याची तक्र ार ग्रामीण पोलिसात केली.पोलिसांनी तातडीने पालगाव येथे जाऊन मिलची पाहणी केली. त्यानंतर मिलमध्ये कामावर असलेल्या मजुरांची माहिती घेतली. पोलिसांच्या श्वानपथकाने पचखेडी गावाचा मार्ग दाखविला. त्यानंतर पोलिसांनी पचखेडी येथील मजुरांच्या घराची झडती घेतली. परंतु, पहिल्या मजुराच्या घरी काहीच आढळले नाही. त्यानंतर दुसरा मजूर देवदास धोटे याच्या घराच्या झडतीदरम्यान, त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी आपला हिसका दाखविताच त्याने कपाटात लपवून ठेवलेले ७० हजार रुपये पोलिसांना काढून दिले. त्यानंतर त्याला ठाण्यात आणून चौकशी केली असता दुसऱ्या दिवशी लपवून ठेवलेले आणखी २५ हजार रुपये आणून दिले. पोलिसांनी चोरीची रक्कम जप्त केली व आरोपी देवदास धोटे याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ग्रामीणचे प्रभारी ठाणेदार खंडारे, पोलीस शिपाई कुकडे व पथकाने या चोरीचा छडा अवघ्या चार तासात लावला. (नगर प्रतिनिधी)