शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शेळी पालनाच्या नावावर ५३ लाखांनी गंडविले

By admin | Updated: July 6, 2016 00:29 IST

शेळी पालनाचा व्यवसाय करून अल्पावधीत लाखो रुपयांची कमाई करता येईल अशी नागरिकांना भुलथाप देण्यात आली.

सांगलीच्या कंपनीचा प्रताप : जागृती अ‍ॅग्रो फ्रुट्स विरुद्ध गुन्हा दाखलभंडारा : शेळी पालनाचा व्यवसाय करून अल्पावधीत लाखो रुपयांची कमाई करता येईल अशी नागरिकांना भुलथाप देण्यात आली. यातून भंडारा शहरातील अनेक नागरिकांना सांगली येथील जागृती अ‍ॅग्रो फ्रुट्स प्रा.लि. या कंपनीने सुमारे ५३ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली येथील जागृती अ‍ॅग्रो फ्रुट्स लि. या कंपनीने खमारी बुटी येथे अर्धलिज पद्धतीने शेळी पालनाचा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पात एका शेळीची गुंतवणूक केल्यास १४ महिन्यानंतर पाच हजार रुपये व १ लाख रुपये गुंतवणूक केल्यास १४ महिन्यानंतर प्रत्येकी ८ लाख रुपये मिळतील असे आमिष कंपनीने नागरिकांना दाखविले. या कंपनीचे अल्पावधीतच जिल्ह्यात मोठे जाळे पसरविले. कमी पैशात मोठा आर्थिक लाभ होत असल्याने नागरिकही या प्रलोभनाला बळी पडले. दरम्यान काही नागरिकांना या बाबत संशय आल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी पैशाने फसगत होत असल्याचे लक्षात येताच विद्यानगर येथील रामभाऊ खोब्रागडे यांनी त्यांच्यासह अन्य पाच व्यक्तींची ५३ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार कारधा पोलिसात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीविरुद्ध ४२०, ४०६, ४६७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)