शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५३ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 1, 2014 23:17 IST

‘युती तुटली आणि आघाडी बिघडली’ यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांवर माघारीची वेळ आली. काहींना निवडणूक न लढविलेली

भंडारा : ‘युती तुटली आणि आघाडी बिघडली’ यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांवर माघारीची वेळ आली. काहींना निवडणूक न लढविलेली बरी असे वाटले, तर काही स्वयंभू नेत्यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी उमेदवारी कायम ठेवली आहे. काहींना शांत करण्यात पक्षश्रेष्ठीला यश आले तर काहींनी निवडणूक लढण्याचे बंड थोपटले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बंडोबांचा काहीसा सामना करावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्रात प्रमुख राजकीय पक्षात लक्षत रंगणार आहे. भंडारा क्षेत्रात शिवसेना, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चौकोनी, तुमसर क्षेत्रात भाजपा, शिवसेना, काँग्रेसमध्ये तर साकोली क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपात लढत होण्याची शक्यता आहे. मतदानाला १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यात एकाही पक्षाच्या एकाही मोठ्या नेत्यांची प्रचारसभा अद्याप झालेली नाही. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे मात्र जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्याशी संवाद साधला. (जिल्हा प्रतिनिधी)भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत २ नामांकन अवैध ठरले. त्यानंतर १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता १३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. यात भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर किसान गर्जना संघटनेचे राजेंद्र पटले हे शिवसेनेकडून लढत आहेत. काँग्रेसने प्रमोद तितीरमारे यांना तर भाजपाने चरण वाघमारे यांना रिंगणात उतरविले आहे. या क्षेत्रात भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे तेथील दावेदारांनी अन्य पक्षात धाव घेतली. निष्ठावंतांचा फटका भाजपला बसणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कुणबी समाजाला, भाजपाने तेली समाजाला तर सेनेने पोवार समाजाला जवळ केले आहे. त्यामुळे प्रत्येकच उमेदवार ताकदीने कामाला लागला आहे.भंडारा : अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रात एकूण ४९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत १३ नामांकन अवैध ठरले. त्यानंतर ३६ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता १९ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर आणि बहुजन समाज पार्टीने देवांगणा विजय गाढवे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारली आहे. बसपाकडून सामाजिक बांधणी सुरू आहे. काँग्रेस आणि राकाँच्या उमेदवारीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे असंतुष्ठांनी बंड पुकारत उमेदवारी दाखल केली होती. काहींना शांत करण्यात आले असले तरी काँग्रेस आणि राकाँमध्ये आतून कुरघोडी होण्याची शक्यता बळावली आहे. राकाँने सच्चिदानंद फुलेकर यांना भाजपने रामचंद्र अवसरे यांना तर काँग्रेसने युवराज वासनिक यांना रिंगणात उतरविले आहे.भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रात एकूण ४२ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत १ नामांकन अवैध ठरला. मंगळवारला दोन उमेदवारांनी नामांकन मागे घेतले तर शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी असे २० उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २१ उमेदवार रिंगणात कायम आहेत. साकोली क्षेत्र कुणबीबहुल आहे. याच समाजाची मते अधिक असल्यामुळे सर्वच प्रमुख पक्षाने यावर भर दिला आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकांनी दिल्ली व मुंबईच्या वाऱ्या केल्या होत्या. परंतु उमेदवारी नाकारल्यामुळे या पक्षात प्रचंड धुसफुस सुरु आहे. सामाजिक बांधणीवर भर दिलेल्या राकाँने सुनिल फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने सेवक वाघाये यांना, भाजपाने राजेश काशीवार यांना तर सेनेने प्रशांत पडोळे यांना रिंगणात उतरविले आहे. विजयासाठी लाखांदूर तालुका महत्त्वाचा ठरणार आहे.