पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:46+5:30

प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम एच ४० डी एल २७०४ हा ट्रक २६ जनावरांची अवैध वाहतूक करताना शिवनीबांध पॉईंटवर जाताना निदर्शनास आला. सदर ट्रक सानगडी येथे जात होता. सानगडी येथे अनेक वर्षापासून जनावरांची तस्करी करण्याचे मोठे केंद्र आहे. शिवनिबांध पॉईंटवर ट्रक पकडून पोलिसांनी ट्रक चालक फैयाज अहमद (३९) रा. नागपूर याला अटक केली.

51 animals rescued in police raid | पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरांची सुटका

पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरांची सुटका

Next
ठळक मुद्देदोन ठिकाणी कारवाई। दोन ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : निर्दयतेने दोन ट्रकमध्ये कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असताना साकोली पोलिसांच्या धाडीत ५१ जनावरे कत्तलखान्यात जाण्यापासून मुक्त करण्यात आली. या कारवाईत १३ लाख ८१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एम एच ४० डी एल २७०४ हा ट्रक २६ जनावरांची अवैध वाहतूक करताना शिवनीबांध पॉईंटवर जाताना निदर्शनास आला. सदर ट्रक सानगडी येथे जात होता. सानगडी येथे अनेक वर्षापासून जनावरांची तस्करी करण्याचे मोठे केंद्र आहे. शिवनिबांध पॉईंटवर ट्रक पकडून पोलिसांनी ट्रक चालक फैयाज अहमद (३९) रा. नागपूर याला अटक केली.
दुसऱ्या कारवाईमध्ये ट्रक क्रमांक एम एच ४० बीजी ७५६७ ट्रक देवरीहून येत असताना साकोली शहरातील एकोडी रोड चौकात थांबवून झडती घेण्यात आली. सदर ट्रकमध्ये २५ जनावरे अवैधरीत्या वाहतूक करताना सकाळी साडेदहाच्या सुमारास पकडण्यात आले. ट्रक चालक सय्यद फिरोज (४०) रा. नागपूर याला अटक करण्यात आली.
दोन्ही ट्रकमधील गोवंश खैरी येथील सुकृत गौशाळा येथे पोलिसांनी पाठविले. दोन्ही वाहनांमध्ये ३४ ते ३५ गौवश असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये संख्या कमी दाखवण्यात आली अशी चर्चा साकोली तालुक्यात होत आहे.

साकोलीत पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक अमित वडेट्टीवार किशोर पुंडे स्वप्निल भजन कर कैलास गायधनी स्वप्निल गोस्वामी अश्विन भोयर यांनी कारवाई केली. अधिक तपास साकोली पोलीस करीत आहेत.

Web Title: 51 animals rescued in police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस