शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

जनधन योजनेतील महिलांच्या खात्यांवर ५०० रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना । गर्दी टाळण्यासाठी बँकेचे वेळापत्रक जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम २ एप्रिल रोजीच बँकेकडे वर्ग करण्यात आली असून बँक आणि ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली आहे.लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. बँकांसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले असून ३ एप्रिल रोजी ज्यांचा खाते क्रमांकाचा शेवट शून्य किंवा एक ने होतो त्या खात्यातील रक्कम काढता येईल तर ४ एप्रिल रोजी खात्याचा शेवटचा अंक दोन किंवा तीन होता त्यांना रक्कम काढता आली. ५ आणि ६ एप्रिलला सुटी असल्याने व्यवहार बंद राहणार असून ७ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक चार किंवा पाच असेल, ८ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक सहा किंवा सात असेल आणि ९ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ८ किंवा नऊ असेल त्यांना रक्कम काढता येईल अशी माहिती अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली आहे. संबंधितांनी नेमून दिलेल्या दिवशी आणि वेळापत्रकानुसार बँकेत जावे, तेथे गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.लॉकडाऊन असल्याने अनेक गोरगरीबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर कुठेही रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठूण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या जनधन खात्यात दरमाह तीन महिन्यापर्यंत ५०० रूपये येणार असल्याने गोरगरीबांना खास करून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या