शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून ४५ लाखांचा बांबू हट प्रकल्प अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्चर कोका येथे दोन स्ट्रॅक्चर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोका येथे पर्यटनीय विकासाला चालना मिळावी या हेतूने आसाम धर्तीवर बांबू हट (कॉलेज) प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली होती. सन २०१७-१८ मध्ये ग्रीन कंपनी फरीदाबाद यांना कामाचे कंत्राट मिळाले होते. पंरतू तीन वर्षांचा कालावधी लोटला असता प्रकल्प अपूर्ण असल्याने पर्यटनीय विकासाला फटका बसला आहे.
कामाचा दर्जा असमाधानकारक व निर्धारित वेळेत कामे पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवीत वन प्रशासनाने कामे बंद पाडल्याची व कंत्राट रद्द केल्याची माहिती आहे. तर रखडलेल्या प्रकल्पातील बरेच साहित्य वाळवी व पावसामुळे खराब होण्याच्या स्थितीत आहेत.
भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्चर कोका येथे दोन स्ट्रॅक्चर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते.
यामध्ये कोका येथे प्रत्येकी ३.६० लाख अंदाजपत्रकीय लहान स्वरुपात दोन बांबू हट, प्रत्येकी १९ लाख अंदाजपत्रकीय दोन मोठे कॉटेज व कॉरमेंट्री यांचा समावेश आहे. अंदाजपत्रकीय ४५.२० लाखांची सदर कामे वर्षभरात पूर्ण करावयाची होती. परंतू करारनाम्यानुसार तीन वर्षानंतरही कामे पूर्ण न झाल्याने तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता असमाधानकारक दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडल्याची व कंत्राट रद्द झाल्याने कंत्राटदार न्यायालयात गेल्याची माहिती आहे. वनप्रशासन व कंत्राटदार यांच्यात यामुळे वादावाद व दबाव निर्माण केले जात असल्याचे बोलले जाते.

कोका येथे सन १९१२ मध्ये निर्मित इंग्रजकालीन वनविश्रामगृहाची दुरुस्ती सन २०१७ मध्ये करण्यात आली व विविध सोईसुविधा पर्यटनविकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आली. परंतु बांधकामापासून येथे पर्यटक येण्यासाठी कुठलीही प्रचार व प्रचाराची यंत्रणा राबविण्यात न आल्याने विश्रामगृह पर्यटकविणा ओसाड असतो.
रावणवाडीतील प्रकल्प रद्द?
कोका व रावणवाडी येथे बांबू हटचे प्रत्येकी दोन स्ट्रॅक्चर मंजूर करण्यात आले होते. कोका येथील दोन्ही स्ट्रॅक्चरचे काम सुरु करण्यात आले. परंतु रावणवाडी येथील प्रकल्पाच्या कामाला अजुनही सुरुवात झालेली नाही. प्रकल्प थंडबस्त्यात का ठेवण्यात आला, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. रावणवाडी येथील प्रकल्पच रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग