शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

११७ पैकी १११ आंतरजिल्हा बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:22 IST

जिल्हा परिषद प्रशासनाने ११७ आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. यात अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या होत्या.

नवीन सीईओंचे आदेश : अनियमितता अधिकाऱ्यांना भोवणारप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद प्रशासनाने ११७ आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. यात अनियमितता असल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या होत्या. यासंदर्भात "लोकमत"ने वृत्तमालिका प्रकाशित केली. दरम्यान मंगळवारला रूजू झालेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी याची दखल घेत ११७ पैकी १११ बदल्या रद्द करण्याचे आदेश काढले आहे. आंतरजिल्हा बदल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेमध्ये गाजले. याप्रकरणात अनेकांनी आर्थिक व्यवहारातून बदल्या केल्याची व त्यात अनियमितता असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त अनुपकुमार यांनी चौकशी समिती गठित केली होती. तीन दिवस या समितीने जिल्हा परिषदेमध्ये ठाण मांडून बदल्या प्रकरणांची फाईल्स तपासल्या. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता. त्या अनुशंगाने ११७ बदल्या बद्दल करण्यात आल्या होत्या. आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत "लोकमत"ने वृत्तमालिका चालविली. दरम्यान या बदल्या प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला "डेप्युटी सीईओंचा खोडा" या आशयाचे वृत्त "लोकमत"ने आज प्रकाशित केले. नव्याने रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी लोकमतचे वृत्त वाचून सकाळी यासंबंधात शिक्षणाधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधीर वाळके यांना विचारणा केली. यात शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुमत आढळून आले. मात्र आयुक्तांच्या पत्रांची दखल घेवून सीईओ सुर्यवंशी यांनी आज बुधवारला ११७ पैकी १११ बदल्या रद्द करण्याचे आदेश काढले. हे आदेश त्यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावले. ११७ पैकी सहा शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या सहा शिक्षकांना वगळून उर्वरित सर्व बदल्या बद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान बदल्यांमध्ये "मध्यस्थी" करणाऱ्यांनी घेतलेले पैसे परत करावे लागणार असल्याने त्यांचे मोबाईल बंद ठेवले आहे. त्यामुळे पैसे देवून बदल्या करणाऱ्या शिक्षकांमध्ये आता आर्थिक लुट झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सीईओंच्या बदल्या रद्द संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.