शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

तलाव दुरुस्तीला १० लाख मंजूर

By admin | Updated: May 21, 2017 00:22 IST

आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती.

चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून निधीवरठी : आठ महिन्यापासून वरठी येथील तलावाच्या दुरुस्ती करिता टाळाटाळ होत होती. तलावाची पाळ दुरुस्त न झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी तलाव दुरुस्तीचा प्रश्न लावून धरला होता. आमदार चरण वाघमारे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन जिल्हा परिषद भंडारा यांना आकस्मिक निधीतून तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना दिली. अखेर तलाव दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरु होणार आहे.आठ महिन्यापूर्वी वरठी येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी वाहून गेले. यात शेकडो एकर शेतातील धानपिक नष्ट झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आठ महिन्यापासून तलावाच्या दुरुस्तीसाठी मागणी होत असतानाहीअधिकारी दुर्क्षक्ष करीत होते. सदर तलाव जिल्हा परिषद भंडारा च्या लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भंडारा तलावाची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. पण आठ महिन्यापासून काम पूर्ण करण्याकरिता निधी नसल्याची ओरड सुरु होती.पावसाळा जवळ असून काम सुरु न झाल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी अखेर तलाव दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन सदर बाब आमदार चरण वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. याबाबत आमदार वाघमारे यांनी सदर बाब जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या लक्षात आणून देऊन प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. तलाव दुरुस्त न झाल्यास शेकडो एकर शेतीपिक घेण्यासाठी वंचित राहिली असतील. याबाबद ग्रामपंचायत वरठी येथे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पद्माकर पराते यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली होती. यावेळी सरपंच संजय मिरासेल जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके, मोहगावचे सरपंच राजेश लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बोरकर, थारनोद डाकरे, शेतकरी वामन थोटे, राजू भाजीपाले, रामू चकोले, झिंगर मरघडे, शिवा गायधने, सुरेंद्र भाजीपाले व दामोधर गायधने यांच्यासह ४२ शेतकरी उपस्थित होते.तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेच्या आकस्मिक निधीतून दहा लक्ष रुपये मंज़ूर झाले असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. सदर काम लवकरात लवकर सुरु करणे आवाहन असून याबाबत संपूर्ण लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.