शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं हस्ताक्षर उलगडून सांगेल तुमचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्व; वाचा अक्षराची विशेषणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:31 IST

तुमचा लिखाणाचा सराव मोडला असेल मान्य, पण अक्षराचे वळण आजही नेमके कसे आहे, यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व कळू शकते!

मोबाईल आणि कॉम्प्युटर आल्यापासून आपलाच काय पण विद्यार्थ्यांचाही लेखनाचा सराव सुटला आहे. कोव्हीड काळात तर जरा जास्तच! मध्यंतरी बातमी होती, की सगळा अभ्यास संगणकीय पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात अडचणी येत आहेत. याचाच अर्थ लेखनाशी आपण किती दुरावलो आहोत ते पहा! बालपणी किती निगुतीने हस्ताक्षर रेखाटण्याचा आपण प्रयत्न केला असेल, परंतु आता कोणी काही लिहायला सांगितले, तर कागदावर जणू काही किडा मुंग्यांची पावले उमटतील. तर काही जणांचे अक्षर एवढे वाईट येते की त्यांना स्वतःलाही वाचता येत नाही. परंतु, अजूनही काही जणांचे अक्षर अगदी मोत्याच्या दाण्यासारखे रेखीव असते. लिखाणाचा सराव असो व नसो, परंतु आपल्या हस्ताक्षरावरून स्वभाव कळतो असे म्हणतात. याचे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणारे अभ्यासकही आहेत. अशाच काही गोष्टींवरून आपण आपला आणि इतरांचा स्वभाव हस्ताक्षराशी मेळ खातोय का, ते पाहूया...!

>> छोटे अक्षर स्वार्थी, निग्रही व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाते. याउलट मोठे अक्षर नेतृत्वाचे गुण दर्शवते. 

>> स्वभावाबरोबर हस्ताक्षर बदलते आणि हस्ताक्षराबरोबर स्वभाव बदलतो. 

>> स्वच्छ, टापटीप हस्ताक्षर असणारी व्यक्ती तिच्या राहणीमानाबाबतही टापटीप असते. 

>> ज्यांचे हस्ताक्षर ओळीच्या वर डोकावत राहते, ते लोक म्हत्त्वाकांक्षी असतात. ते आपले ध्येय जिद्दीने मिळवतात. 

>> ज्यांचे अक्षर वळणदार असते, ते लोक प्रत्येक बाबतीत गोपनीयता ठेवतात आणि कधीही कोणतीही खेळी खेळू शकतात. 

>> ज्यांचे अक्षर सुरुवातील मोठे आणि पुढे पुढे मुंगीच्या पावलांसारखे लहान लहान होत जाते, असे लोक अतिशय लबाड असतात.

>> ज्यांचे अक्षर सुरुवातील रेखीव आणि नंतर कोंबडीच्या पायासारखे असते, ते लोक आरंभशूर असतात. कामाची सुरुवात उत्साहाने करतात पण लगेचच त्यांचा उत्साह मावळत जातो. 

>> ओळीला जोडून काढलेले अक्षर हे वक्तशीरपणा, एकनिष्ठता आणि वचनाला पक्के असण्याची खूण आहे. असे लोक अतिशय प्रामाणिक असतात. 

>> ज्यांचे अक्षर सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एकसारखे असते, असे लोक सरळ स्वभावाचे तसेच ईमानदार, उदार असतात.