शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

...तर दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:45 IST

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले

- नीता ब्रह्मकुमारीएकदा एक व्यक्ती रेल्वेच्या जेवणाच्या डब्यात बसून जेवत होती. त्याच्यासमोर एक अनोळखी जोडपे बसले होते. त्या स्त्रीने उंची वस्त्रे आणि हिऱ्याची किमती आभूषणे घातली होती, पण ती आनंदी दिसत नव्हती. ती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्र ार करत होती की, ही जागा किती घाणेरडी आहे, देण्यात आलेली सेवा चांगली नाही आणि अन्न तर अगदीच गचाळ, पण तिचा पती याउलट अगदी मनमोकळा, गोड स्वभाव आणि सर्व गोष्टी सहजतेने घेणारा.

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. पत्नीची ओळख करून देताना स्मित हास्य करत म्हणाला की, ‘माझी पत्नी उत्पादन व्यवसायात आहे.’ तिच्याकडे बघून थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, कारण ती एखाद्या कारखानदार वा व्यावसायिकासारखी वाटत नव्हती. म्हणून ती व्यक्ती विचारते, ‘कशाचे उत्पादन करता?’ त्याने मस्करीत उत्तर दिले की, ‘ती तिच्याच दु:खाचे उत्पादन करते’ हे उत्तर ऐकून तिथले वातावरण बर्फासारखे थंडगार झाले.

खरेच या महिलेसारखे कित्येकजण असे आहेत की, ते नकारात्मक विचारांनी स्वत:च्या जीवनात सतत दु:खाचे उत्पादन करीत असतात, पण हे सत्य आहे की, आपले विचार आणि दृष्टिकोनाद्वारे आपण आपल्यासाठी सुख किंवा दु:ख निर्माण करण्याचे साहित्य गोळा करत असतो. आनंदी राहण्याची सवय स्वत:ला लावण्याची गरज आहे. जसे एखादे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आवश्यक असते. त्यात काही वस्तू बिलकूल निकामी असतात; परंतु त्यापासून काही उत्तम बनवले जाते.

सुखाची निर्मिती करायची असेल तर वाईट प्रसंगातून मिळालेली शिकवण, आपली सहनशक्ती, व्यक्तींची खरी ओळख असे फायदेही असतात. ते पाहायची सवय लावली तर सर्वोत्तम असे करू शकतो. ‘काहीही असो मला आनंदी राहायचंय’ हे वारंवार लक्षात आणल्याने दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक