शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

बोध देऊन गेलेल्या विंचवाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 6:07 AM

आनंदाने ध्यानाला बसलो आणि समोर नजर गेली. पाहतो तर काय - एक विंचू माझ्याकडे सरळ बघत होता. मनात भीतीचे वादळ उभे राहिले. आता काय करावे?

- धनंजय जोशीझेन शिबिरासाठी कधी कधी शहरापासून जरा दूर जावे लागते. अशाच एका ठिकाणी जायचे ठरले. तिथे फक्त साध्या झोपडीसारखी सोय होती. दिवसातून दोनदा जेवणाची व्यवस्था व्हायची. बाकी सर्व वेळ साधना! संध्याकाळी सान सा निम भेटत, तुमची प्रगती कशी चालली आहे ते बघण्यासाठी.मी माझ्या झोपडीपाशी पोहोचलो. माझे बसण्याचे आसन ठेवले. समोर एक छोटासा बुद्धाचा पुतळा ठेवला. उदबत्ती लावली... आनंदाने ध्यानाला बसलो आणि समोर नजर गेली. पाहतो तर काय - एक विंचू माझ्याकडे सरळ बघत होता. मनात भीतीचे वादळ उभे राहिले. आता काय करावे? पहिला विचार मनात आला, चप्पल कुठे आहे? ह्या विंचवाला मारल्याशिवाय हे एकांत शिबिर शक्यच नाही. चप्पल शोधायला लागलो; पण मी आणलेली चप्पल अगदी तकलादू ! मग एखादी काठी शोधायला लागलो. ती कुठे मिळेना. परत झोपडीमध्ये आलो, तर ते महाराज दिसेनात! जिथे पूर्वी होते तिथे ते नव्हतेच ! परत चिंतेचे वादळ ! इकडे तिकडे त्याला शोधू लागलो आणि दिसला तोपण आता माझ्यापुढे असण्याऐवजी तो माझ्या मागच्या बाजूला बसला होता. मी डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. मनामध्ये विचार आला, ‘अरे, तू ह्या झोपडीमध्ये सात दिवसासाठी आला आहेस, म्हणजे तात्पुरताच! तो विंचू कदाचित इथेच राहणारा असावा. मग ही झोपडी त्याची का तुझी? आणि तुला कोणी हक्क दिला त्या विंचवाला तिथून घालवून देण्याचा? तुला जेवढा इथे राहण्याचा अधिकार, तेवढाच त्याला नाही का?’- शांतपणे डोळे उघडले. तो विंचू जिथे होता तिथेच होता. त्याला मनातल्या मनात म्हटले, ‘बाबा रे, मी इथे सातच दिवस राहणार. आपण दोघे शांतपणे बरोबर राहू. मी तुला मारत नाही आणि तुही मला माझी साधना करू दे!’ - साधना सुरू झाली. संध्याकाळी बघितले तर तो दिसेनासा झाला होता. सान सा निम मुलाखत घेण्यासाठी भेटले. म्हणाले, ‘हाउ आर यू? - मी नमस्कार घालून म्हणालो, ‘थँक यू फॉर युअर टीचिंग!’