शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया जिवंतपणी मोक्षाचा मार्ग, त्यांच्याच अभंगातून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:00 IST

नामदेव म्हणत, की आपले सद्गुरु विसोबा खेचर यांच्याकडून देहात असतानाच त्यांनी मरण्याची विद्या शिकून घेतली होती.

संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. २६ जुलै रोजी (तिथीनुसार) त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या हयातील भरपूर साहित्य निर्मिती केली व आपल्या आचरणातून समाजापुढे अध्यात्माचा आदर्श ठेवला. आजच्या तिथीला त्यांनी देह ठेवला तरी मोक्षपदाला ते जिवंतपणीच पोहोचले होते. 

असे म्हणतात, की मृत्यनंतरही इच्छा शिल्लक असतील, तर पुन्हा जन्म आणि जिवंत असताना इच्छा संपल्या तर मोक्ष मिळतो. मात्र आपल्या इच्छांची यादी एवढी मोठी असते की एका जन्मात काही ती पूर्ण होत नाही. परंतु संतांनी त्या इच्छांना, वासनांना मुरड घातली, म्हणूनच ते जन्म मरणाचा फेरा संपवून मोक्ष पदाला पोहोचू शकले. हे ज्ञान त्यांना कसे अवगत झाले, याबद्दल खुलासा करताना संत नामदेव एके ठिकाणी लिहितात-

मनुष्यशरीराची घटक असणारी पंचतत्त्वे विघटित होणे म्हणजेच शरीर मृत होणे. नामदेव म्हणतात की आपले सद्गुरु विसोबा खेचर यांच्याकडून देहात असतानाच मरण्याची विद्या शिकून त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्याचेच वर्णन ते पुढील अभंगात करतात-

आपप तेज वायू पृथिवी गगन,मेले ते कवण पंचामध्ये।।आम्हा मरण नाही मरशील काई,आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखे।।जिताची मरण आलेसे हाता, मरण बोलता लाज नये।।खेचर विसा म्हणे आम्हा मरण नाही,कैसे मरण पाही आले नाम्या।।

देहाची पाच तत्त्वे जेव्हा मूळ पाच तत्त्वात अर्थात पंचमहाभूतात परत जाऊन मिळतात तेव्हा माणसाला मरण येते. तथापि मी मृत्यूपलिकडे गेलो आहे. मला कसे काय मरण येईल? गुरुदत्त नामाने मला आपले आत्मस्वरूप उमजले आहे. मी तर जिवंतपणेच मरायला शिकलो आहे. त्यामुळे आता मला मरणाची भीती वाटत नाही. आम्ही आमचे मरण स्वत:च पाहिले आहे. तेव्हा आमच्यासाठी मरण उरलेच नाही.

अशी स्थिती प्राप्त होणे सर्वसामान्य माणसासाठी कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी संत उपाय सुचवतात, 

विषय उपेक्षूनि, अनुभव लक्षूनि,आत्मपदी वस रे, मानस नारायण भज रे।।

विषयातून आपली सुटका होणार नसली, तरी अलिप्त नक्कीच होता येईल. त्यासाठी मन भगवंत नामात गुंतवायला हवे. एकदा प्रभुपदाची गोडी लागली, की इतर विषय त्यासमोर गौण वाटू लागतील व मृत्यूचे भयही राहणार नाही.