शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या शाकंभरी नवरात्रीची समाप्ती; त्यावेळी म्हणा देवीची 'ही' आरती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 27, 2021 18:55 IST

गेले आठ दिवस आपण देवीची जी पूजा केलीत, त्याचा समारोप करताना देवीची आरती म्हणा आणि देवीचा कृपाशिर्वाद मिळवा. 

शाकंभरी अर्थात फळ भाज्या देणारी देवी. एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ भाज्यांची निर्मिती केली होती. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आणि उद्या त्याची सांगता. गेले आठ दिवस आपण देवीची जी पूजा केलीत, त्याचा समारोप करताना पारंपरिक हिंदी आरती किंवा समाज माध्यमांवर वाचनात आलेली मराठी आरती म्हणा आणि देवीचा कृपाशिर्वाद मिळवा. 

शाकंभरी देवीची पारंपरिक आरती 

हरि ॐ श्री शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजोऐसी अद्भुत रूप हृदय धर लीजो शताक्षी दयालु की आरती कीजोतुम परिपूर्ण आदि भवानी मां, सब घट तुम आप बखानी मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो तुम्हीं हो शाकुम्भर, तुम ही हो सताक्षी मांशिवमूर्ति माया प्रकाशी मां,शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो नित जो नर-नारी अम्बे आरती गावे मांइच्छा पूर्ण कीजो, शाकुम्भर दर्शन पावे मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो जो नर आरती पढ़े पढ़ावे मां, जो नर आरती सुनावे मांबस बैकुंठ शाकुम्भर दर्शन पावेशाकुम्भरी अंबाजी की आरती कीजो। 

शाकंभरी देवीची मराठीत आरती 

शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥

मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥

अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥

चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥

पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥

वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥

टॅग्स :Navratriनवरात्री