अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:54 IST2020-10-12T01:54:30+5:302020-10-12T01:54:43+5:30

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे.

Mahashakti Ratna Kiran Prabhaji Masa of spiritual practice | अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

अध्यात्म साधनेची महाशक्ती रत्न किरण प्रभाजी मसा

अध्यात्म साधनेची महान शक्ती साध्वी रत्न किरण प्रभाजी महाराज साहब शासन प्रभावना विहार यात्रेत जेथे कोठे आल्या संघाच्या प्रत्येक बाल-वृद्धाला देव गुरू, धर्माबद्दल स्थिर केले. संघात सुख, शांती, संघटनचे वातावरण माताजींच्या स्नेहमयी वर्तनाने नेहमीच राहिले.

प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी मसा यांनी नेहमीच सगळ््यांना आपला सहवास लाभल्यावर सौभाग्यशालीच म्हटले. माताश्रींशी संबंधित अगदी लहान गोष्टीलाही अक्षररुपात प्रदान करणे सुरू केले तर संपूर्ण जीवन व्यतीत झाल्यावर त्यांची महिमा, व्यक्तीमत्वाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. पूज्यवरांचे हेच सान्निध्य आपल्या जीवनाला, संयमाला सार्थक करण्याचा सर्वश्रेष्ठ सोपान आहे.

आर्यिका रत्नत्रयीची उत्कृष्ट आराधना, संयमाची सर्वोच्च साधना, शेकडो-हजारोंना सम्यक दृष्टी, देशव्रती बनवणारी झाली आहे. माताजी तुमच्या कायायोगचा प्रत्येक अणु आत्मदृष्टी देणारा, आत्मशुद्धी करणारा आणि आत्मसिद्धांत उपलब्ध करणारा आहे.
जिनशासनच्या अनेक महान साधकांचे स्मरण करून देणारे तुमच्या जीवनाचे प्रत्येक वळण, प्रत्येक आयाम समृद्धी, वैभव, अनुकूलतेचा आभास देत आला आहे. तुमचा मनोयोग नेहमीच उत्कृष्ट वृत्तीमुळे सगळ््या जिवांना जिनशासनशी जोडणारा आणि स्नेहाने परिपूर्ण झऱ्यासारखा वाहात राहो. -साध्वी विपुलदर्शना

Web Title: Mahashakti Ratna Kiran Prabhaji Masa of spiritual practice