यंदा १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा(Maghi Purnima 2026) येत आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, या पौर्णिमेला 'बत्तीशी पौर्णिमा' असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे किंवा दानाचे फळ आपल्याला ३२ पट अधिक मिळते. दैनंदिन आयुष्य सुखकर करण्यासाठी आणि प्रतिकूल ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी हा दिवस अत्यंत पर्वणीचा मानला जातो.
माघ पौर्णिमा २०२६: अडकलेला पैसा, मान-सन्मान परत मिळेल; १ फेब्रुवारीला रविपुष्य योगावर करा 'हे' उपाय
माघ स्नानाचे दिव्य महत्त्व
माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी गंगास्नान करावे. ते शक्य नसल्यास घरामध्येच पहाटे लवकर उठून स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान करताना पवित्र नद्यांचे स्मरण केल्यानेही मनुष्याची पापे नष्ट होतात आणि ग्रहदोष सौम्य होतात, असे शास्त्र सांगते.
पूजन आणि सत्कर्म
या दिवशी श्रीलक्ष्मी, विष्णू आणि चंद्राची मनोभावे पूजा केली जाते. देवाला गंध, अक्षता आणि फुले वाहून स्तोत्रपठण करावे. मात्र, केवळ देवाची पूजा पुरेशी नसते; खऱ्या अर्थाने देव प्रसन्न व्हावा असे वाटत असेल, तर स्वार्थापलीकडे जाऊन यथाशक्ती दान करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे.
ग्रहदोष निवारणासाठी 'विशेष दान'
तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार माघ पौर्णिमेला खालील गोष्टींचे दान केल्यास उत्तम फळ मिळते:
रवी दोष (सूर्य): सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन सात प्रकारचे धान्य दान करावे.
चंद्र दोष: मनाच्या शांततेसाठी साखर आणि तांदूळ दान करणे शुभ ठरते.
मंगल दोष: कर्जातून मुक्ती किंवा कलह टाळण्यासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान करावा.
बुध ग्रह: बुद्धी आणि व्यापारातील प्रगतीसाठी केळी, करवंद किंवा नारळाचे तेल दान करावे.
गुरू ग्रह: ज्ञानासाठी आणि अनुकूलतेसाठी गूळ, तूप किंवा गरजू मुलांना पुस्तके द्यावीत.
शुक्र ग्रह: सुख-सुविधांसाठी लोणी, पांढरे तीळ किंवा तीळ वडीचे दान करावे.
शनिदेव: साडेसाती किंवा शनीच्या त्रासावर काळे तीळ, तिळाचे तेल, लोखंडी भांडे किंवा काळे वस्त्र दान करावे.
राहू-केतू: अडथळे दूर करण्यासाठी राहूसाठी बूट-चप्पल, अन्न-वस्त्र आणि केतूसाठी टोपी, घोंगडी दान करून दिव्यांगांना मदत करावी.
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय!
सारांश
केवळ वस्तू दान केल्याने नशीब बदलत नाही, तर त्यामागे स्वच्छ मन आणि शुद्ध आचरण असणे आवश्यक आहे. जेव्हा तुमची मनस्थिती बदलते, तेव्हा तुमची ग्रहस्थिती आणि परिस्थितीही आपोआप बदलू लागते.
Web Summary : Maghi Purnima on February 1st, 2026, offers 32-fold blessings for donations and good deeds. Bathing in holy rivers or with Gangaajal at home is auspicious. Donate items based on planetary positions to mitigate negative effects and improve luck. Pure intentions amplify the benefits.
Web Summary : १ फरवरी, २०२६ को माघी पूर्णिमा पर दान और अच्छे कर्मों का ३२ गुना फल मिलेगा। पवित्र नदियों में स्नान या घर पर गंगाजल से स्नान शुभ है। ग्रहों की स्थिति के अनुसार दान करने से नकारात्मक प्रभाव कम होते हैं और भाग्य बेहतर होता है। शुद्ध इरादे लाभ को बढ़ाते हैं।