....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 15, 2021 10:58 PM2021-01-15T22:58:50+5:302021-01-15T22:59:24+5:30

उत्तम आरोग्यासाठी रामबाण उपाय म्हणून जो प्राचीन उपाय वापरला जातो, तो म्हणजे च्यवनप्राश! त्याच्या निर्मितीची ही पौराणिक कहाणी!

.... hence this form got the name Chyavanprash! | ....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले!

....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले!

Next

फार पूर्वी शर्याति नावाचा राजा होता. त्याला अनेक अपत्ये होती. तो प्रजाहितदक्ष राजा होताच, शिवाय तो कुटुंबवत्सलदेखील होता. आपला राज्यकारभार सांभाळून तो आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. एकदा सहपरिवार राना वनाचा फेरफटका करत असताना राजा राणी बोलत बसले. त्यांची मुले वयाने मोठी होती, शूर होती. ती इतरत्र फिरत होती. 

असाच फेरफटका मारत असताना राजकुमारी सुकन्या हिच्या हातून एका मातीच्या ढीगाला दगड लागला आणि त्यातून रक्त वाहू लागले. ती घाबरली. तो मातीचा ढीग नसून त्यात कोणाचा तरी मानवी देह आहे, याची तिला कल्पना आली. तिने तत्काळ ओरडून आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना तिथे बोलावून घेतले. रक्त थांबत नव्हते. 

राजाने पुढाकार घेऊन मातीचा थर दूर केला. तर त्या ढीगाखाली च्यवन नावाचे थोर तपस्वी तपश्चर्या करत बसले होते. राजकुमारी सुकन्याच्या हातून चुकून लागलेल्या दगडामुळे त्यांचा डोळा जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले. 

राजाने तत्काळ आपल्या राज्यातून राजवैद्यांना बोलावून घेतले. ऋषींची मलमपट्टी केली. परंतु, राजवैद्यांच्या सांगण्यानुसार च्यवन ऋषींनी आपली दृष्टी गमावली होती.

हे वृत्त कळल्यावर राजकुमारी सुकन्येला अपराधी वाटू लागले. ऋषींनी क्षमा केली, तरी तिला तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करून घ्यायचे होते. ती आपल्या वडिलांना म्हणाली, `पिताश्री, माझ्यामुळे ऋषींची दृष्टी गेली, आता मीच त्यांचे नेत्र होईन. अर्थात मी त्यांच्याशी विवाह करून त्यांचा सांभाळ करीन.'

दोघांच्या वयातील तफावत पाहता राजाने तिला अडवले, परंतु तिने आपलेच म्हणणे पुढे रेटले. राजाने च्यवन ऋषींशी राजकन्येचा विवाह लावून दिला. 
च्यवन ऋषींची तपश्चर्या पाहून देवतांनी त्यांना वरदान दिले आणि आयुर्वेदीक औषधे दिली, ज्यामुळे च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाले आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने ऋषींनी पुढे राजकन्येसोबत सुखाने संसार केला.

Web Title: .... hence this form got the name Chyavanprash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.