शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2026: आज दिवसभरात हनुमान जन्माची कथा वेळात वेळ काढून एकदा तरी वाचाच; मिळेल अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:43 IST

Hanuman Jayanti 2026 Katha in Marathi: चैत्र पौर्णिमेला पहाटे हनुमानाचा जन्म झाला, हा जन्मोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, मात्र जन्मकथेच्या वाचनाशिवाय उपासना पूर्ण होणार नाही. 

आज २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव (Hanuman Jayanti 2026) आहे. त्यानिमित्ताने हनुमंताची वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली कथा जाणून घेऊया आणि जन्मोत्सवाच्या तिथीला अर्थात पहाटे सूर्योदयाच्या वेळी ६. ४० मिनिटांनी कथेचे पुर्नवाचन करून हनुमंत जन्मोत्सव साजरा करू! ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात आठवणीने कथेचे एकदा तरी वाचन करा. 

Hanuman Jayanti 2026: हनुमान आणि शनी मंदिर नेहमी शेजारीच का असते? जाणून घ्या यामागील 'हे' गुपित!

पौराणिक कथा : 

हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती. अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव `पुंजिकस्थला' होते. एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून 'तू वानरी होशील' असा शाप मिळाला. तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला `इच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील' असा उ:शाप मिळाला. त्यामुळे ही अप्सरा कपियोनीत 'कुंजर' या वानराची मुलगी `अंजना' म्हणून जन्माला आली.

अंजनाचा विवाह पुढे वाननराज केसरीशी झाला. तो सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनीसह आला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावण्य पाहिले आणि तो काममोहित झाला. त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला. यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवि उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले.

चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य!

जन्मकाळ आणि मतभेद : 

हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत. प्राचीन काळापासून वैदिक, तांत्रिक, पौराणिक, ललित सर्व प्रकारच्या वाङमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत.

'वाल्मिकी रामायण' हे सर्व रामायणात आद्य मानले जाते. यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही, परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे. यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे. यावरून निष्कर्ष निघतो, की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी. सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो. 

आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा.

या विवेवचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल. मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे, की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात.

Hanuman Jayanti 2026: हनुमंताला १ पुत्र होता आणि ५ भाऊ; काय होती त्यांची नावे? वाचा रंजक आणि अज्ञात पैलू!

चिरंजीवी हनुमान : 

हनुमान चिरंजीवी अर्थात अमर आहेत यावर भक्तांचा विश्वास आहे आणि ते आपल्या संकटकाळी धावून येतात अशी दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी आपण हा जन्मोत्सव साजरा करतो आणि हनुमानासारखी शक्ती, युक्ती, भक्ती मिळावी अशी प्रार्थना करतो. बजरंग बली की जय!

English
हिंदी सारांश
Web Title : Hanuman Jayanti 2026: Read Hanuman's birth story for immense blessings today!

Web Summary : Hanuman Jayanti is on April 2nd. Read Valmiki's story of Hanuman's birth at sunrise (6:40 AM) or anytime during the day for blessings. Hanuman, son of Anjana and Kesari, is believed to be Chiranjeevi (immortal). Devotees celebrate his birth seeking strength, wisdom, and devotion.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीLord HanumanहनुमानIndian Festivalsभारतीय उत्सव-सण